Skip to main content

जीवनमान

काही 'जपानी' अनुभव

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 18/06/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक. अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता.

अटरली बटरली.....

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 17/06/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
अटरली बटरली..... मला खात्री आहे की वरचं शीर्षक वाचून संपता-संपताच तुम्ही नकळत मनात ते पूर्ण केलं असेल....... डेलिशस! :-) जितकी ही जिंगल तब्बल पाच दशकं भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे, तितकीच त्या अमूल होर्डिंग्जवरची 'अमूल गर्ल'! काही वर्षांपूर्वीपर्यंत एक वेळ अशी होती की दर आठवड्याला एक होर्डिंग लागायचं.

शेअरींग

लेखक सही रे सई यांनी रविवार, 17/06/2012 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची सात वाजताची वेळ. रस्त्यावर नेहमीचीच तुडुंब गर्दी. मी ऑफिस मधुन घरी रस्त्यातुन वाट काढत काढत चालले होते. नळस्टॉपपाशी बराच वेळ सिग्नलला उभी होते. तेवढ्यात तिथे दोन मुले गुलाबांचे टवटवीत रंगीबेरंगी गुच्छ घेउन फिरताना मला दिसली. त्या गुलाबांकडे पाहिल्यावर इतक प्रसन्न वाटलं की चटकन ती फुले मनात भरली आणि घ्याविशी वाटली. पण इतक्यात सिग्नल सुटणार असे माझ्या लक्ष्यात आले. मनाला थोडी रुखरुखच लागली. मनात म्हणलं हरकत नाही. उद्या घेउ ते गुच्छ. पण सिग्नल सुटल्यावर वळून थोडी पुढे आले आणि दिसले की काही बायका फुटपाथ वर हे असेच गुच्छ विकत होत्या.

गोवा रंगीला रे...

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 14/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

शोध तुकारामाचा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 11/06/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत.

पराभूत थोरवीच्या शोधात

लेखक रमताराम यांनी रविवार, 10/06/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.' माहागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते.

नवरा नाही काही कामाचा

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझा नवरा नाही काही कामाचा माझा नवरा आहे बिनकामाचा सकाळी सकाळी पिवून येतो संध्याकाळी झोकून घेतो बिनघोर पडतो रात्रीचा दारू प्यायला मागतो पैसे पैसे मी आणावे कुठून कसे त्यासाठी कायम करतो घोशा फाटक्या संसारात पडला पाय तुम्हीच सांगा मी करावं काय त्याला पायपोस लागेना कशाचा दुसर्‍या बायांकडे बघते जेव्हा आनंद होतो मनात तेव्हा संसार तसा होवो माझा सुखाचा

रमेश व सुरेश

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 10/06/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश. अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले.

डास व त्याचे चावणे

लेखक भरत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज या धाग्याच्या निमित्ताने एका सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहे. विषय आहे डास व त्याचे चावणे. हसू नका किंवा धाग्याला नाक देखील मुरडू नका. त्याचप्रमाणे हा धागा एकोळी-बहूओळी, गणपतीला स्वेटर, गुलाबजामाच्या पाकाचे काय करायचे, सोफा, फुडप्रोसेसर कसा घ्यावा असा वर्गीकृत करू नका. डास, त्याच्या चावण्याने होणारे आजार, मलेरिया या कारणांमुळे सरकारे, महानगरपालिका, पालिका, ग्रामपंचायती, गल्या, कॉलन्या, आपली घरे व पर्यायाने आपण सर्वसामान्य जनता वैतागून त्याचप्रमाणे हादरून जातात.