Skip to main content

जीवनमान

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

लेखक भरत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/08/2012 05:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत
नमस्कार श्रोतेहो. आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

अनोखे रक्षाबंधन

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 06/08/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.

नो प्रोब्लेम ...

लेखक यशोधन वर्तक यांनी शुक्रवार, 03/08/2012 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक प्रोब्लेम्ला उत्तर हे असताच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा हवा असतो तर कधी मानसं . या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो ....वपुर्झा ..व . पु . काळे यांनी काही वर्षांपूर्वी या ओळी लिहिल्या आणि प्रोब्लेम्स कडे पाहायचा आपला नजरीयाच बदलून गेला. त्या आधीचा माझं जगणं म्हणजे ' बाहर है प्रोब्लेम घरमे है प्रोब्लेम ...आगे पीछे आजू बाजू प्रोब्लेम हि प्रोब्लेम ' असे होते. मला आठवतंय लहानपणी शाळेत असताना गणित हा विषय म्हणजे माझं शत्रू नंबर वन . उदाहरण संग्रह सोडवून तयार ठेवणे हा माझ्या समोरचा मोठा प्रोब्लेम असे.

जीवनव्रती...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 03/08/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातला मंडणगड तालुका म्हणजे एकेकाळी सरकारी नोकरांसाठी `अंदमान'! इथे बदली होणं ही शिक्षा समजली जायची. याच तालुक्यातल्या हजारभर वस्तीच्या घराडी गावातली ही कथा. रायगड जिल्ह्य़ात उरण गावातली शाळा आजही `किनरे गुरुजींची शाळा' म्हणून ओळखली जाते. गावातल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठवावं म्हणून किनरे गुरुजींनी घरोघर अक्षरश: वणवण करून पटसंख्या जमविली. ९० मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आज चार हजार मुलं आहेत. किनरे गुरुजींचं शाळेशी असलेलं नातं आजही शाळेनं जपलंय. किनरे गुरुजींच्या पत्नीचं माहेर घराडीतलं. वागळ्यांकडचं. माहेरचं हे घर किनरे यांच्या पत्नीला मिळालं होतं.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.

अघळपघळ, इकडचं तिकडचं - १

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 02/08/2012 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाकचे प्रधानमंत्री झरदारींनी आपल्या आदरणीय सरदारजींना, देश के बडे वीरजी - मनमोहन सिंगांना आता पाकिस्तानात यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.. हम्म.. म्हणजे मनमोहनपंतांनी तेथे जाऊन त्यांच्या मस्तपैकी गोष्त-बिर्यानीचा खाना कुबुल केल्यानंतर आणि पाकड्यांशी नव्याने दोस्ताना केल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा भारताने पाक-पुरस्कृत काही अतिरेकी कारवायांना सज्ज राहण्यास हरकत नाही..! --------------------------------------------------------------------------------- याला म्हणतात इमान - याला म्हणतात भक्ती..

रक्षाबंधन.. रक्षाबंधन ..

लेखक विदेश यांनी गुरुवार, 02/08/2012 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
. रक्षाबंधन... रक्षाबंधन दोन मनांची अतूट गुंफण ! हिरा भाऊ अन् बहीण अंगठी अंगठीस हो सुरेख कोंदण ! मदतीस्तव वा संकटातही धावे बंधू करण्या रक्षण ! भावाचा बहिणीस आधार द्रौपदीसखा तो नारायण ! दुजाभाव ना मनांत कोठे दोघांचे ते एकच रिंगण ! रक्षाबंधन ... रक्षाबंधन दोन जिवांचे अतूट बंधन ! .
काव्यरस

(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)

लेखक रमताराम यांनी बुधवार, 25/07/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...) आता पुन्हा उपोषण होणार मग देश ढवळून निघणार मग बेदींना कंठ फुटणार मग मध्येच मोदी बोलणार मग जुनाच खेळ चालू होणार... काऽऽय रेऽऽ देवाऽऽ... मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार... मग सारीपाट मांडणार... मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार... मग ते कुणीतरी ओरडणार मग अण्णा-मित्र असतील तर रडणार रामदेव बाबा असतील तर चिडणार मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना काहीच घेण-देणं नसणार... काय रेऽऽ देऽऽवा मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार... मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार... मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 25/07/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आजचा दिवस कसा जाणार आहे किंवा आत्ता इथे आहोत, दिवस संपताना कुठे असणार आहोत वगैरे काहीच आपल्याला माहित नसतं. याचं अगदी शब्दशः प्रत्यंतर मला आलं, परवा, २२ जुलैला. दिवस सुरू झाला पुण्यात आणि अगदी अनपेक्षितपणे संपला मेंढ गावात, जितूच्या घरी. *** गेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'.