लेडीज स्पेशल ट्रेन-एक सर्व्हे
विनिता देशपांडे यांचा लेख वाचून मला काही दिवसांपुर्वीची आठवण झाली.. आम्ही काही जणींनी मिळुन संध्याकाळी सी एस टी हून सुटणार्या लेडीज स्पेशल ट्रेन मधे सहज एक प्रश्णावली दिली होती, अनेक जणीनी उत्तर दिलीच, शिवाय अशिक्षित बायकाना ही विचारून त्यांच्या वतीने उत्तरे भरली.. एक खूप छान अनुभव होता, पण निष्कर्ष तेवढा छान नव्हता..आश्चर्य म्हणजे, सगळ्यांच्या उत्तरात अनेक समान गोष्टी होत्या..अर्थात, यात काही सिध्द करणे वा रडगाणे गाणे वा खाजगी गोष्टीत नाक खुपसणे हा उद्देश नव्हता. जरा, सगळ्यांना व्यक्त होण्याची सन्धी देणे आणि मैत्री करणे ,हे अपेक्षित होतं.
मिसळपाव
प्रचंड धाप लागलेल्या अवस्थेत, तो रडत-खडत, कसाबसा, पाण्याबाहेर आला, अंगातील कपडे शरीराला घट्ट चिकटले होते. चालताना सैल होणार्या पॅन्टच्या बॉटममधुन पाणी गळत होते, मुरुममिश्रीत मातीत वाहणार्या पाण्यामुळे त्याच्या बुटांचा " छपाक-छपाक " असा आवाज येत होता.
आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.