Skip to main content

जीवनमान

डाव

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 06/12/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचं कोवळं सोनसरी ऊन चहूकडे पसरले होते. निंबाळकरांच्या वाड्यासमोरच्या हौदात त्या उन्हाचे कवडसे पडुन उन उन हिरे चमकत होते. कधी काळी ज्या वाड्यात हिर्‍यांचा लखलखाट असायचा तिथे आता या हिर्‍यातच समाधान मानून घ्यायला लागत होते. वाड्यासमोरच्या सैलसर मो़कळ्या पटांगणात निंबाळकरांचे दोन चार बैल चरत होते. पलीकडेच नुकतीच पाडसाला जन्म दिलेली गौरा गाय पाडसाला दूध पाजत होती. निंबाळकर तसे जुन्या वळणाचे त्यामुळे पाडसाचे दूध त्यांनी हिरावून घेतले नव्हते. बाकी पटांगणात गावातल्या कुठल्याही घरात असतो तसा आणि तितकाच पसारा पडला होता.

सदाबहार देवानंद ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/12/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
देवानंद म्हटले की मला माझे बालपन आठवून जाते. अगदी लहानपणी होतो तेव्हा कालापाणी बघितला. होता. खोया खोया चाँद गाने म्हणत सायकल शिकलो होतो . देवानंद सारखे दिसायचे देवानंद सारखे बोलायचे त्याच्या स्टाईलने चालायचे असा हा माझा ,तुमचा आवडता हीरो. गाईड बघितला. फली मिस्त्रिची अप्रतिम फोटोग्राफी नि देवानंदचा अभिनय सिनेमाची स्टोरी काळजात कायमची घर करून गेली देवानंद म्हटले की मला माझे बालपन ,तारुण्य आठवू लागते. आणि माझ्या शरीरात तारुण्याचा झरा अवखळपणे वाहू लागतो. देवानंद म्हणजे मला अगदी घरातला जिवाभावाचा मित्र वाटत होता. हल्ली हल्ली मी देवानंद बघतच नव्हतो.

आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मालेगाव क्याम्प .!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/12/2011 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
घर नं -. ३३ सोनार गल्ली मटण मार्केट जवळ मालेगाव क्याम्प ,मालेगाव जिल्हा ;-नासिक पत्ता अजून पाठ आहे. आता आम्ही मोठे झालो होतो. पाचवीत गेलो होतो. मिरजे वरून सरळ मालेगावात आमचा तंबू पडला होता. ट्रकमध्ये सामान नि आम्ही आख्खे कुटुंब.सोनार गल्लीत घर घेतले होते. एकदम जुने नि अंधारलेले. आम्ही म्हणालो - बाबा किती अंधार आहे ..? छी... कसले हे घर....!! गल्लीत एक घर बांधून तयार होते. माडीचे. चौकशी केली. घर मालक आले. विचारले. मालक घर भाड्याने द्यायचे म्हणाला. भाडे ठरले. पसंत पडले.

आजोबांच पेन

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

|| || माझे गाव माझे बालपण || ||

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 01/12/2011 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा " काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत. मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची.

मीही कवि होणार!

लेखक मेघवेडा यांनी बुधवार, 30/11/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्‍याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्‍या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला! होणार, मीही कवि होणार, छंद नको मज, नकोत वृत्ते अलंकारही नकोत भलते गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार! यमक तेवढे ठाऊक मजला तितके पुरते कवी व्हायला अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा कचरा मी भरणार.. मीही कवि होणार कविता म्हणजे हवीच प्रीती द्विपुएव सर्वनाम चित्ती विशेषणांच्या खिरापतीने तुझे पोट भरणार..

वाट !!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 30/11/2011 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही. वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत. तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात.