Skip to main content

जीवनमान

करंssट-मिसळ(४४० व्होल्ट)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 01/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस लिहिन..लिहिन म्हणत होतो,,,सौरभनी काल आमच्या या करंट मिसळची अठवण करुन दिली ,आणी आज मुहुर्त लागला...तर ठाकाण कोणतं..?

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

ते दिवस सुंदर होते ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 31/01/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात कधीतरी छान दिवस येतात . खूप मनासारख्या घटणा घडत राहतात. कुणाचेतरी आशीर्वाद आपल्यामागे असतात . आणि हे खूप खरे असते. मला अचानकपणे छान नोकरी मिळाली.मिळेल की नाही असे वाटत असताना मिळाली.कुणाचा वशिला नव्हता. डोक्यावर कुणाचा हात नव्हता. तशी ह्या महानगरात कुणाची तशी ओळख नव्हती.गावाच्या मुलाची जशी परिस्थिती तशी माझी होती पण वरच्याचा हात होता. त्याने बोट पकडले होते. आणि मी त्याच्या आधाराने वाट तुडवीत होतो. . मुंबईत छोटासां फ्ल्याट होता काकाचा. ते निवृत्त झाले होते.नि. जरा निवांत जगावे म्हणून ते गावी आले होते. निसर्गात ते मनापासून रमत होते.गावाकडची थंड हवा त्याना हवी होती.

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

नाईट शिफ्ट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/01/2012 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते. अन हा जास्त पगार म्हणजे फुकट असत नाही. त्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. सर्व ठिकाणी कामाची परिस्थिती आनंददायक असतेच असे नाही. असो. असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती.