Skip to main content

जीवनमान

टेकडीच्या माथ्यावर

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 06/10/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी महात्मा सोसायटीच्या मागच्या टेकडीवर व्यायामाच्या निमित्ताने फिरायला जात असे. हल्लीही जातो पण दोन वर्षापूर्वी जसा सलग दोन वर्षे नित्यनियमाने जात असे तसे आता काही राहीले नाही. पण अजूनही टेकडीवर कधी गेलोच तर पूर्वीचाच ताजवा जाणवतो. टेकडीवरच्या कितीक मजेशीर आणि अन्य प्रसंगामुळे टेकडीवर फिरायला जाणे हि कल्पना दिवाळीच्या सणाइतकी मनाला प्रसन्नता देणारी असते. पश्चिम ते पूर्व असा विस्तार असणार्‍या ह्या टेकडीचे एक टोक पश्चिमेकडे मुंबै-बंगळूर हायवेकडे तर पूर्वेचे गांधीभवन-डहाणूकर कॉलनी भागाला वळसा घालून कर्व्यांच्या कॉलेजकडे उतरते. टेकडीवर मी पश्चिमेच्या दिशेने न जाता पूर्वेच्या दिशेने जातो.

म्हातारबाँचा दिवस...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 01/10/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आमचे म्हातारबॉ भलतेच खुश असतात. कारण त्यांचे दिवटे चिरंजीव म्हणजे आम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो असून आम्हांमुळे म्हातारबाँच्या कितीतरी आगंतुकांना बांडगुळासारखे हक्काचे शोषण करुन घेण्याची नामी संधी त्यायोगे मिळालीय. खायचं, प्यायचं अन् ह्याचं जुळव, त्याचं मोड अशी लावालावी करीत गावोगाव उंडारायचं. हेच त्यांचं ज्येष्ठ काम उरलंय. त्यांची साठी उलटली तेव्हा आम्हांला वाटलं त्यांच्या हाती काठी येईल पण छे! म्हातारबाँनी अनेक सवलतीच्या पासांची ताटीच बांधली... यष्टी, रिल्वे यांचे तर अर्ध्या तिकिटाचे पास आहेतच.