Skip to main content

जीवनमान

What is non-negotiable in your life?

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/09/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "लीडरशिप" अर्थात नेतृत्व विषयक लेख वाचतेय. माझा अतोनात आवडीचा विषय. म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी नाही तर नुसता वाचनमात्र म्हणून. एक खूप सुंदर लेख *१ वाचनात आला काल परवा. विषय होता - What is non-negotiable in your life? अर्थात तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही? मग लेखकाने पुढे दिले आहे जर तशी मूल्य नसतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं आयुष्य हे वादळात हेलकावे खाणार्‍या नौकेसारखं का भरकटत आहे किंवा तुम्ही समाधानी का नाही आहात तर ते रास्तच आहे ई.

चप्पल पुराण

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 17/09/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
नदीचं मुळ आणि साधूच कुळ कुणी शोधू नये असं म्हणतात. मला वाटतं तसचं चपलांचा इतिहास कुणी शोधू नये. पादुका, खडावा, चप्पल,बूट असा हा चपलेचा अनंतकाळाचा प्रवास ...

असा कसा हा पेपरवाला!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 17/09/2010 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला. बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात.

भेग.. भाग - ३

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 17/09/2010 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://www.misalpav.com/node/14413 भाग २ : http://www.misalpav.com/node/14430 ---------------------------------------------------------------- अव गौराक्का, जाताल की जरा येळानी, इतक्या वर्षानी येव्हड्या लांबुन आलायती, वाइच इसंत घ्या अन मग जावा की. म्या बी बघा अडानी तुमी शहराला काय करता, कुठ असता असलं काय बी अजुन पुसल नाय. सांजेला गप्पा मारुच की निवांत असे म्हणतच माझे पाय शेजारील पडलेल्या वाड्याकडे वळाले. ए टिंग्या, तुझी आत्या तर लय डेंजर दिसतीया .. मन्या. का रं ?

माझ्या शौर्याच्या (??) सुरस कथा!!!!

लेखक सविता यांनी शुक्रवार, 17/09/2010 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
तशी काही मी शूर या सदरात मोडत नाही किंबहुना घाबरटच म्हणायला हवे. इतकी फ़िरले गेल्या तीन-चार वर्षात...माझ्या या सगळ्या प्रवासात अंधाराची भिती वाटते(आणि एकटेपणाची सुद्धा!!)...म्हणून माझ्या रुम मधले दिवे मी कधी बंद करत नाही....झोपतानासुद्धा...जास्त भिती वाटली तर टि.व्ही., रेडिओ हे पण रात्री झोपताना चालू ठेवते. आणि असे कधीतरी एकटे असताना नेमके नको ते प्रसंग आठवतात म्हणुन मी कधीही भुताखेताचे पिक्चर बघत नाही किंवा पुस्तके पण वाचत नाही... मला प्रवास करणं ( तो पण विमानाने...आणि कंपनीच्या खर्चाने!!!) आवडायला लागलं आहे वाटतं.

शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीत: शेतात जायाची माझी झाली आता येळ
आग कारभारनी झाली का झुनका भाकर? शेतात जायाची माझी झाली आता येळ ||धृ|| निसती मिरची कुट ग जरा तीचा खर्डा कर ग चवीला बरा भाकरीबरूबर लागं तिखाट जिभंला मंग पानी प्यावं म्हंतो पोटाला बेगीनं आवर आन चुलीत पेटव जाळ शेतात जायाची माझी झाली आता येळ ||१|| त्याच्यासंग दे ग तू कांदा पातीचा लाव भाकरीला एक हात लोण्याचा घरी राकून ठेव प्वाराला दुध गाईचं उरल्यालं मला दे तांब्यात वाईचं लवकर टाक त्यात उलीसा गुळ श
काव्यरस

स्टेपनीची गरज

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 13/09/2010 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
गाडीचे चाक अनेक कारणांनी पाहिजे तसे काम देत नाही किंवा अधिक वापरापायी गुळगुळीत झाल्याने रोडवरची ग्रीप कमी होत जाते. अशावेळी गाडी पंक्चर वा बर्स्ट झाल्याने बाजूला होऊन साईडला उभी करावी लागते. लगेच स्टेपनी उपलब्ध असेल तर रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही हे निश्चित. थांबला तो संपला म्हणतातच की. स्टेपनी नावाची चीज कामचलाऊ असली तरी रडत खडत चालणाऱ्‍या गाडीला नवी उमेद देते हे खरे. पण मित्रांनो आपण स्टेपनी लावून धावतोय हे गाडीला समजू नये यातच खरी मौज दडलेली असते. यासाठी मूळ चासीखाली दणकट जॅक मोठ्या विश्वासाने लावावा लागतो. त्या आधी खिळखिळे झालेले चाक निवडून साईडला ठेवायचे.

'आदिम ते हायटेक'

लेखक श्रावण मोडक यांनी सोमवार, 13/09/2010 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
"(आदिवासी भाग दुर्गम असतात) लेकीन मोबाईल और इंटरनेट की वजहसे इट इज नो मोअर अ रिमोट एरिया... जव्हारमें शायदही कोई ऐसा बच्चा हो जिसने ये क्लिपिंग नही देखी." "(आदिवासी स्त्रीचं शोषण सुरूच आहे). प्रमाण कमी झालं, पण पद्धत बदलली."
पहिलं उद्धरण आहे पोलीस उपअधीक्षकांचं (इन्सिडेंटली, त्या एक महिला आहेत), आणि दुसरं आहे आदिवासी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्याचं. जव्हार. ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील आदिवासी भाग. फेब्रुवारीत हा भाग ढवळून निघाला. अजूनही ढवळलेला आहेच. जव्हारच्या शिवाजीनगर भागातील एका महिलेचे अश्लील लैंगीक चित्रीकरण करण्यात आले. त्याचे व्हायचे तेच झाले.