प्रेरणादायी २० गोष्टी
आज तर नक्कीच विमान चुकणार असा विचार करत कसाबसा अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचलो तर विमान दोन तास ऊशीराने असल्याचे फळकावर झळकत होते. हुश्श करुन चेक इन सोपस्कार आटोपले आणि वेळ घालवायला म्ह्णून पुस्तकाच्या दुकाना कडे वळलो. मुखपॄष्ठावर उलटी अक्षरे बघून कुतूहलाने साहाजिकच पुस्तक उचलले. Connect the Dots - रश्मी बंसलचे. त्यांच्या Stay Hungry Stay Foolish बद्दल कुठेतरी ऐकले होते. लेटेस्ट २०१० चे प्रकाशन व २०० रु किंमत पाहुन वेळ घालवायला बरे असेल म्हणून लगेच घेतले.
"अचानक धनलाभ" माझ्या राशी भविष्यात होते की काय कोण जाणे.
मिसळपाव