Skip to main content

जीवनमान

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

सच्चा माणूस!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 20/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
जून २००७ च्या सुमारची घटना. संजय संगवईचं निधन झालं होतं. त्याच्या आठवणी मी 'मनोगत'वर जागवल्या होत्या. लेखनावर एक प्रतिक्रिया आलेली दिसली. पत्रकारितेतील माझ्या अनुभवांविषयीचा उल्लेख त्यात होता. मी या व्यवसायात आहे हे फारसं कुणाला ठाऊक असण्याचं कारण नव्हतं. जालावरच मी नवा. सदस्याचं नाव पाहिलं, 'भोचक'. मी उडालो. हा कोणाचा भोचकपणा, स्वाभाविक प्रश्न आला. काही कळणं शक्य नव्हतं. व्यनि करणं शक्य होतं. माझ्या स्वभावानुसार ते काही झालं नाही. मीही नंतर फारसा रस दाखवला नाही. त्याची आणि माझी अखेरपर्यंत भेट न होण्याचं कारण तिथं असावं का? हे मनाचे खेळ.

तर्क जाणत्यांचा

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 19/07/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्‍याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्‍या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले.

माझा 'रेल्वे पोलिस' अनुभव

लेखक डोमकावळा यांनी रविवार, 18/07/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
"सुम्या....चल रे आवर पटकन.... साली ८.३० ची लोकल सुटायची." मी बुटाची लेस बांधत ओरडलो. एम.एस्सीच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाची गोष्ट आहे. एम.एस्सी ची चौथी सेमिस्टर म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग असायाचं. माझ्या सुदैवाने मला एका छोट्या कंपनीत म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी जॉब मिळाला होता. आता सुदैवाने म्हणणं योग्य आहे कारण पहिल्या सेमिस्टर पासून प्लेसमेंट होइपर्यंत एकतर मला कधी फ़र्स्टक्लास वगैरे काही माहितच नव्हता. उलट एटीकेटी, जयकर का काय तो नियम (इतर विषयात पास झाल्यावर एखाद्या विषयात २-४ मार्क वाढवुन पास करतात तो नियम) वगैरे सारख्या सुविधांचा यथेच्छ वापर करीत आपलं शिक्षण चाललं होतं.

निगरगट्ट आठवांचा चिखल..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 17/07/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच... अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात. जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी...

कळतं पण वळत नाही

लेखक शुचि यांनी शनिवार, 17/07/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी नवर्‍याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती. तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या. पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला.

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 13/07/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न. अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं.

कांदा,मुळा,भाजी...

लेखक स्वाती२ यांनी रविवार, 11/07/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी लहान असताना परीक्षा आणि अभ्यास या मुळे नको वाटणार्‍या मार्चची मी इथे आल्यापासून आतुरतेने वाट बघते. मार्च उजाडला की गार्डन सेंटर च्या फेर्‍या सुरू होतात. टॉप सॉईल, कंपोस्ट, बियाणं सगळ्याची खरेदी होते. छोटी-मोठी अवजार बाहेर येतात. भरपूर ऊन येणार्‍या खिडक्यांसमोर सीड स्टार्टर चे ट्रे मांडले जातात. हळू हळू त्यात छोटी रोपं तयार होतात. काही जगतात, काही कोमेजून जातात. बाहेर जमीनीची मशागत केली जाते. तिथेही बी पेरले जाते. तयार केलेली रोप जमिनीत लावली जातात. हळू हळू माझा वेजी पॅच आकाराला येतो. मुख्य म्हणजे या सगळ्यात नवरा उत्साहाने सामिल होतो.

ध्वनी - गॅरे कैझर या लेखकाच्या दृष्टीकोनातून

लेखक शुचि यांनी गुरुवार, 08/07/2010 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल फिरायला जाताना मी आणि नवरा इकडच्या तिकडच्या विषयांवरच्या गप्पा मारत होतो. सहज विषय निघाला "कोबेअर रिपोर्ट" शो चा. मध्यंतरी व्हरमाँट चा एक लेखक या शो मधे येऊन गेला. या लेखकाचं नाव "गॅरे कैझर". त्यानी या शो मधे काही नावीन्यपूर्ण विचार मांडले होते - ध्वनी या विषयावर. या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे "द अन्वाँन्टेड साऊंड ऑफ एव्ह्रीथिंग वी वाँट" घरी जाऊन मी मी जालावर त्याचे विचार वाचले आणि पुढील काही रोचक गोष्टी सापडल्या. त्या या लेखाकाच्या शब्दात- "उपासमार, महायुद्ध, पृथ्वीचे सातत्याने वाढणारे तापमान आदि समस्यांशी तुलना केली तर ध्वनी ही अजीबात समस्या वाटत नाही.