Skip to main content

जीवनमान

नाष्टा-ए-पाणीपुरी

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 05/06/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुऱ्‍यांतून पाणी पिणं काय किंवा पाण्याच्या पुऱ्‍या खाणं काय, दोन्ही एकाच आंबट पाण्याच्या दोन बाजू. तिसऱ्‍या बाजूकडून म्हणजे रस्त्यावरून माझ्या नजरेत तो पाणीपुरीचा ठेला भरला. तिथे उपस्थित जनसमुदायाला पाणीपुरी गिळतांना पाहून माझ्याही पोटात कोरड पडली. वळवळणाऱ्‍या जिभेभोवती चळाचळा पाणी सुटले. तरीही त्या पुऱ्‍यांमधल्या आंबट गोड पाण्याची पंचस्वादीय चव जिभेला खूपच हवीहवीशी वाटली अन् त्यामुळेच की काय पाच गिर्रेबाज गोल पुऱ्‍यांची डोकी टचाटचा फुटली! अन् फुटक्या डोक्यानिशी बशीत दाटीवाटीनं आसनस्थ होण्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणखी काय काय पहावं लागणार गं बाई..

२७ ऑगस्ट २०१०

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 04/06/2010 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
एका पुढे ढकललेल्या इ पत्रातून ही माहिती मिळाली आहे. २७ ऑगस्ट २०१० ला मंगळ हा पृथ्वीच्या अतीशय जवळ येणार आहे. त्यादिवशी पहाटे १२.३० वा ( म्हणजे बहुतेक २६ ऑगस्ट ला रात्री) चंद्र आणि मंगळ आकाशात खूप जवळ दिसतील.

भोचकपणा नुसता.....

लेखक भानस यांनी गुरुवार, 03/06/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे.....

गारांचा पाऊस

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 03/06/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन!

भस्म्या !!

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 03/06/2010 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी पयल्यांदा हातात नांगर धरला; तवा माझा बां मला म्हणला व्हता, "तुज्या आयला जर तू वरबाडलास; तर ती गप बसलं का?" "आर ही बी धरणी माय हाय. धर ह्यो गुळाचा खडा, अन आम्बलिची धार; वाहा तिला. म्हन , आधीच उन्हान तरपासलेल्या तुला; मी नांगरटीन उलथवतोया ! धरणी माते , माझ्या हाताला यश दे! माग! माग!

मनश्री

लेखक जयवी यांनी गुरुवार, 03/06/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
मनश्री…..एका दृष्टिहीन मुलीची “नेत्रदीपक” यशोगाथा…….!! सुमेध वडावाला (रिसबूड) ह्यांनी शब्दबद्ध केलेली “मनश्री उदय सोमण” ह्या अंध मुलीची गाथा आपले “डोळे” खाडकन उघडते. एका नेत्रहीन मुलीने ज्या काही हिंमतीने तिच्या व्यंगावर मात करुन यश मिळवलंय ते वाचून आपण आश्चर्याने थक्क होतो. तिच्या जन्मापासून तर तिच्या “बालश्री” हा पुरस्कार मिळण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासात लेखकाने तिची आई, वडील, तिची बहिण, खुद्द मनश्री ह्यांच्या शब्दातून तिची जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाचं जिवंत शब्दचित्र चितारलंय. हे वाचताना पदोपदी डोळे भरुन येतात…..

दाता इतना दिजे....

लेखक रामदास यांनी गुरुवार, 03/06/2010 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनमोल रत्नांना स्वतःचा असा खास इतिहास असतो. मार्क अँटनीचा आताच कुठेतरी उल्लेख झालासा वाटला आणि एक संदर्भ आठवला एका ओपल रत्नाचा. नॉनीयस नावाच्या एका सिनेटर कडे हे ओपल होते. ओपल म्हणजे हिरा नव्हे.ओपलची गणना उपरत्नामध्ये होते.फारसे दुर्मीळ नसणारे रत्न आहे. पण रत्नाची किंमत ठरते आपल्याला हवे असणे आणि आपल्याकडे नसणे यावर . मार्क अँटनीने नॉनीयस कडे ते रत्न मागीतले .नॉनीयसने नकार दिला.

ती...

लेखक भानस यांनी मंगळवार, 01/06/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोकल, म्हणजे विविधतेचा मुक्त खजिना. मी, सदैव माणसांमध्ये रमणारी. ठराविक गाड्या, त्यामुळे अनेक तऱ्हांनी ओळखी. ब्रिजवरून धावता धावता दृष्टीस पडणारी नेमकी माणसे. डब्यात तर...... नुसते डोळ्यातून दिसणारे प्रश्न, आपुलकी..... आलीस का? ह्म्म... काही हात उंचावून दखल घेणार्‍या. मैत्रिणींच्या मैत्रिणी.... अग आज शालीनि दिसत नाहीये. न विचारताच माहिती पुरवणार्‍या. काही न बोलणार्‍या पण जागा देणार्‍या. एखादे दिवशी, माझ्या सुंदर साडीवर, ती कशी खुलतेय तुझ्या अंगावर.... लांबूनही मस्त गं अशा खुणा करणाऱ्या सख्या.