Skip to main content

जीवनमान

~*~*~*~ राजीव'जींना भावपूर्ण श्रद्धांजली ~*~*~*~

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 21/05/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजीव गांधी!... आपल्या सर्वांचं एक आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्व! भारताचे यशस्वी -माजी पंतप्रधान! २१ मे १९९१, रोजी रात्री, कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तामिळनाडू येथे घडवून आणलेल्या मानवी बॉम्ब-हल्ल्यात झालेला राजीव'जींचा मृत्यू केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण विश्ववासीयांना मोठा मानसिक आघात देऊन गेला!..... राजीवजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! ..... *~*~*~* STILL WE MISS YOU.... RAJEEV'JI...... LOVE YOU.......

स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 20/05/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं.

तुझी घागर नळाला लाव...

लेखक फटू यांनी बुधवार, 19/05/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.

"देवा ....कंटाळलो या रक्तदाबाला ... करतो आता आत्महत्या...!!"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी बुधवार, 19/05/2010 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षकातील वाक्य.... हे आहे दोन दिवसापूर्वीच दुनळी बंदूक आपल्या नरड्याला लाऊन घेऊन उजव्या पायाच्या अंगठ्याने चाप ओढून स्वत:च्या जीवाची अखेर करून घेतलेल्या श्री. रामचंद्र गिरी या फौजदाराच्या चिठ्ठीतील एक वाक्य ! वय वर्षे ५४... "गोसावी" अशा भटक्या (अनुसूचित) जमातीमधील व्यक्ती.... पहिलवानासारखी देहयष्टी... प्रथम पोलीस म्हणून कोल्हापूर परिक्षेत्रात भरती आणि दहा वर्षाच्या कालावधीतच एक अत्यंत कार्यक्षम आणि कामातील तडफ पाहून वरिष्ठांच्या मर्जीत बसलेले पोलीस अशी ख्याती... शहर, तालुका आणि ग्रामीण भागात सर्वत्रच आपल्या हसर्‍या चेहर्‍याने वावरून भोवतालच्या लोकांची मने जिंकण्याची किमया साधलेली....

आपण काय खातो ...

लेखक अडाणि यांनी सोमवार, 17/05/2010 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली... आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ डॉ. पीटर सींगर हे आहेत.

आपण अन्न खातो तसेच बनतो का?

लेखक शिल्पा ब यांनी रविवार, 16/05/2010 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणी असे ऐकले होते कि आपण जसे अन्न खातो तसे बनतो...म्हणजे सकस अन्न खाल्ले कि सात्विक आणि निकृष्ट उदा..पिझ्झा, खूप तेलकट, रोज शिळे अन्न वगैरे खाल्ले कि निकृष्ट विचार येतात...हे खरे कि नाही माहित नाही...पण कालच आलेला एक अनुभव सांगते...बाळीच्या शाळेत पार्टी होती आणि लहान मुलांचे नाच गाणे झाल्यावर जेवायला म्हणून breadstick सारखा, greasy आणि थंड पिझ्झा होता...आधीच आणल्यामुळे थंड होणारच...पण पिझ्झ्याचा दर्जा काही चांगला नव्हता....आता फक्त $१० मध्ये तिघांचे खाणे म्हंटल्यावर आणि पैसा वसूल करायला मी चांगल्या ६-७ slice खाल्ल्या... दुसर्या दिवशी मला खूपच depressing वाटायला लागले...सकाळचं सगळं उ

कोकणातले `केरळ'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/05/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून गोव्याकडे जाताना, संगमेश्वर ओलांडले, की एक मोठ्ठे वळण पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला `ओझरखोल' नावाचे गाव दिसते. टेकडीएवढ्या हिरव्यागार डोंगरावर, शाळेची एक बैठी इमारत आणि झाडांमध्ये लपलेली कौलारू, केंबळी घरे, उजवीकडे एक रोडावलेली खाडी आणि लहानसा डांबरी रस्ता... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. माधवराव मुळ्ये यांचं हे गाव. इथल्या प्राथमिक शाळेला, माधवरावांचं नाव दिल्यामुळे अनेकांना हे माहीत झालंय. संगमेश्वरच्या अलीकडे गोळवलकर गुरुजींचं गोळवली, आणि पलीकडे माधवराव मुळ्यांचं ओझरखोल...

“बुडीत खाते“ माझेहि ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 14/05/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपा वर सन्माननीय सभासदाचा प्रचंड "काथ्याकुट" सुरु आहे बुडीत “ खा s s त्या"च्या “ हिशेबाचा ! ! ! जो माझ्यासारख्या सामान्य व नवीन मिपाकराच्या आकलना पलीकडे आहे. वाटलं आपणही आपला “ हिशेब ” सांगून मोकळ झालेलं बरं ! कदाचित सन्माननीय सभासंदांना ह्या मनस्तापाचा ताण कमी होण्यांस थोडीफार मदत होईल कोरीच पान आयुष्याची ! ! !
काव्यरस

एका शाळकरी मुलाचा निबंध

लेखक वैदेहीजी यांनी गुरुवार, 13/05/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एका प्राथमिक विभागातल्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्याना एक निबंध लिहायला दिलीला असतो. निबंधा चा विषय असतो "देवाने मला काय बनवावे ?" त्यादिवशी घरी निबंधवह्या तपासताना ती एक निबंध वाचते आणि भावूक होवून जाते. तिचे पती आपया बायकोला असे भावूक होऊन रडताना बघतात आणि तिला रडण्याचे कारण विचारतात ती काही न बोलता समोरची वही उचलून दाखवते . ते निंबंध वाचतात जो खालील प्रमाणे असतो " देव बाप्पा ! मला जादूने जर काय बनवणारच असशील तर "टीव्ही" बनव . मला त्याची जागा घ्याची आहे. मला टीव्ही सारखा जीवन हवय. त्याचे माझ्या कुटुंबां मधील जे अढळ पद आहे ते मला हवाय .

डॉक्टरीणबाई

लेखक शिल्पा ब यांनी मंगळवार, 11/05/2010 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारी चर्चा बरीच जोरात आहे म्हणून आठवली आणि लिहिली. मागच्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो...माझे आई वडील पनवेलात राहत होते...नवऱ्याचे CBD त ....मी पनवेलात गेले होते २ दिवसासाठी...दुसर्या दिवशी दुपारी माझ्या लेकीची शी धुवायला गेल्यावर माझ्या आईला दिसले कि किंचित लालसर आहे...कदाचित रक्त असेल म्हणून ताबडतोब डॉक्टरकडे जावे...मला काही एवढे विशेष आहे असे वाटले नाही पण आईने खूपच जोर केला म्हणून जवळच्याच क्लिनिक मध्ये जिथे बालरोगतद्न्य असते इथे गेलो...गेल्यावर कळले कि त्या इथे येत नाहीत...मग त्यांच्या क्लिनिक मध्ये गेलो... क्लिनिक मध्ये गेल्यावर थोडा वेळाने बाई आल्या आणि