पेपराचं फेफरं
एखाद्या गोष्टीचं अतिरेकी वेड किंवा छंद उफाळला की 'आलं का फेफरं?' असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जातो. आमच्या पेपराचं फेफरं असंच नाक मुरडण्यासारखं. पेपर म्हणजे परिक्षेच्या उत्तरांचा अथवा प्रबंधाचा नसून आमच्यालेखी 'समाजमान' आणि 'भान' या संबंधाचाच आहे.
कालच्या वर्तमानाचा भूतकाळ आज वर्णन करणारे ते एक 'पत्र' जरी असले तरी त्याला पाने मात्र अधिकच असतात. तसं पाहिलं तर पोस्टाचे पत्र आता कालबाह्य झाल्यातच जमा आहे. 'आपली चालू वर्षाची सदस्य वर्गणी त्वरित जमा करा अन्यथा पुढील अंक पाठविला जाणार नाही' अशा आशयाची 'पत्रे' फलाण्या बिस्ताण्या अंकाच्या संपादकाकडून वर्षभर येत राहतात.
मिसळपाव