Skip to main content

जीवनमान

Mom, we are not naive

लेखक स्वाती२ यांनी शुक्रवार, 30/04/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज राजेश घासकडवी यांचा स्त्री प्रतिमेवरील लेख वाचला आणि गेल्याच आठवड्यात घडलेला किस्सा आठवला. माझा लेक . टीनएजर. एकिकडे शरीरात हार्मोन्सच थैमान, अपरिपक्व मेंदू, जोडिला मेडिया. दुसरीकडे मध्यमवर्गी संस्कार आणि झेप घ्यायला उत्सुक महत्वाकांक्षेचे पंख. काल परवा पर्यंत असलेली निखळ मैत्रीही काहिशी बदलू लागलेली. याच गोंधळात साधारण १३ व्या वर्षापासून त्याला हळू हळू मुलींना एक 'स्त्री' म्हणून, एक व्यक्ती म्हणून आदराने वागवणे, 'नकार' पचवणे वगैरे धडे देणे सुरु झाले. अधून मधून वाद व्हायचे पण तरी गाडी बर्‍यापैकी चालली होती.

थरारक अनुभव: अकस्मात...!!

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी मंगळवार, 27/04/2010 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
दि. ७ मे. १९८०. आम्ही तिघेजण. दुपारची वेळ. राजदूत गाडीवरून मालेगांव- चाळीसगांव मार्गावर प्रवास करत होतो. गप्पा मारत हळू हळू जात होतो. दरेगांव फाटा आला. तेथे आम्ही चहा-फराळ केला. चार वाजले होते. एकजण म्हणाला- "आता उतरते ऊन्ह आहे. त्यापेक्षा आपण ५ वाजता निघू." गप्पा मारत आम्ही वेळ काढत होतो. गिरणा डॅमवर मित्राच्या मित्राकडे जेवाअला जायचे होते. मालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता. दरेगांव फाट्यावर आमचा बसणाचा क्रम बदलला. मी मागे बसलो. माझा मित्र मध्ये बसला.

अनुभव: अनोळखी आपुलकी

लेखक वसंत वडाळकर_मालेगांव यांनी शनिवार, 24/04/2010 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
(मी मूळचा रहाणारा नांदुर्‍याचा! मी काही काळाकरता कोकणात गुरांचा डॉक्टर म्हणून नोकरीला होतो. आता रिटायर झालेलो आहे.त्यावेळी मला आलेला एक आपुलकीचा साधा अनुभव येथे सांगतो.) ते होते १९६५ साल. जुलै महिना. चौदा तारीख. कोकणात गेल्या सात दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत होता... पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. रात्रीचे दहा वाजले होते. मी झोपण्याच्या तयारीत होतो. तोच दारावर थाप पडली. "डॉक्टर साहेब आहेत काय?" मी दरवाजा उघडला. समोर ५-६ जण उभे होते. एकाच्या हातात गसबत्ती होती. सर्वांच्या अंगावर घोंगड्या होत्या. मांडीला अर्धे धोतर. "आत या!" सर्वजण घोंगड्या झटकून आत आले.

वाढदिवस

लेखक नेत्रेश यांनी शनिवार, 24/04/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यातील गोष्ट, मुलाच्या शाळेतील बाई त्याची तक्रार सांगत होत्या. "तुमचा मुलगा ऐकत नाही. चित्रात मी सांगीतलेले रंग न वापरता दुसरेच रंग वापरतो. शीकवताना बोलत असतो, पण त्याच्या शेजारच्या मुली शांत असतात (मग हा बोलतो तरी कुणाशी?). मी सांगीतल्या प्रमाणे न करता, सर्व गोष्टी आपल्याला पाहीजे त्या पद्ध्तीने करतो." घरी आई सांगत होती, "सकाळी उठायचा कंटाळा करतो, खुप वेळ बाथरुम मध्ये बसतो, अर्धा तास लावतो नष्टा करयला. त्याला हवे तेच कपडे घालतो. स्वेटर/जॅकेट घालत नाही.

साठीतलं "झपाटलेपण"!

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 23/04/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहा-पंधरा वर्षांहून अधिक काळ आपण सातत्यानं भेटत असलेल्या व्यक्तीची पहिली भेट केव्हा झाली हे आठवायचं ठरवलं तर आठवेल? माझ्यापुरतं उत्तर "मुश्कील" असंच आहे. त्यात अशा आठवणी जाणीवपूर्वक पटलावर आणावयाच्या असतील तर आणखीनच मुश्कील. पण तरीही हा एक खेळ होतो. मनाशीच, मनाचा. या निमित्तानं चार मंडळी जेव्हा एकमेकाशी बोलू लागतात अन् त्यातून त्या व्यक्तीची एक नवीनच ओळख समोर येते तेव्हा हा अनुभव विलक्षण ठरत जातो. सुरवात साधीच होती. 'आंदोलन'च्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांचा फोन आला. "उद्या आपण एकत्र भेटतोय. सुहासचा वाढदिवस आहे, साठावा, त्यानिमित्त..." गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ मी सुहासला ओळखतो.

बालपण !!! आमच ही !!!

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 23/04/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझे पाय मी स्वत:च पाळण्यात पाहिले होते. एक तर आमच्या पिताश्रीना गलेलठ्ठ मिश्या नव्हत्या ज्यावर त्यांनी ताव मारावा, आणि दुसरे म्हणजे जन्म सुपुत्राचा नसून; आता "आणि किती हुंडा द्यावा लागणार?" या लागोपाठच्या दुसरया प्रश्नाचा होता. या साऱ्या गोंधळात आमचे पाय कोण पाहणार हो! असो. झाले असे ; की दिवस सुगीचे होते. रात्रभर मळणी चालली होती. भाताची ! तर जस जस भात बदललं जाईल तस तस खळ्याभोवतालच्या माळावर पिंजर पसरून वाळवण्यासाठी टाकले जाई. आम्हाला लवकर उठण्याची खोड होती.

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/04/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे !

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 21/04/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

आभाळ फुटलं !! (Cloud Burst)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 20/04/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
“आभाळ फुटणं” म्हणजे काय हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. आतापर्यंत हा एक फक्त वाक्प्रचार म्हणूनच ऐकला होता. पण त्या दिवशी त्याचा तो भयंकर अर्थ कळला. १७ एप्रिल ! सकाळ नेहेमीसारखीच उगवली. आमची सकाळ ६ वाजता सुरु झाली. पिल्लू क्रिकेट कोचिंगला जायला निघालं. त्याची तयारी झाली……..आणि मी कामं आटपायला सुरवात केली कारण आज हे सेऊलहून येणार होते. Emirates ची फ्लाइट होती. दुबईला थांबून मग इथे कुवेतला ८.२५ ला पोचणार होती. मी त्यांना घ्यायला साधारण सव्वा आठला निघणार होते. आठ वाजले. मी देवाजवळ दिवा लावला. मी दिवा लावला तेव्हा सकाळचा प्रकाश होता.

(भांडणशब्द)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 20/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर भांडणशब्द थंडावलेला॥१॥ भग्न प्रतिसाद काहीबाही॥२॥ क्षयाधिकार मवाळभाषा॥३॥ गरम माथा अखेर फडफड॥४॥ दीर्घ बतावणी हलकल्लोळ॥५॥ बधीर आवेश ओहोटी संचय॥६॥ विकल भ्रांत चिंताक्लांत॥७॥
काव्यरस