Skip to main content

जीवनमान

तहान

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 11/10/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन काल आम्हीही पाठवला मुद्दाम तयार केलेला एक मेघ प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता. काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर? आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच! व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ. आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल. त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे, बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे. तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा, तो तुला काय कामाचा? आम्ही तो घेऊन दुषीत करा

घर

लेखक टुकुल यांनी शुक्रवार, 09/10/2009 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
टप, टप, टप करत बाजुच्या खिडकिवरचे पावसाचे थेंब जुन्या आठवणींत ओढताहेत. परवा माझ्या नवीन फ्लॅट चा ताबा मिळनार, नवीन फ्लॅट बराच मोठा आणी मस्त सोसायटीत आहे म्हणुन घरचे सर्व जण खुष, आनंद आहे, पण काय माहीत माझ्या सध्याच्या घराला काय वाटत असावे! -------------- खर्रर खर्रर खच्च, घरासमोर ४०७ टेंपो येवुन थांबला, बोलल्याप्रमाणे आज घराचा ताबा घेण्यासाठी दशरथ आला होता.

गांधी जयंती निमित्तच्या ड्रायडेचा तीव्र निषेध!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 02/10/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. या निमित्ताने आजच्या दिवशी देशात लादल्या गेलेल्या ड्रायडेचा (दारुबंदी) मी तीव्र निषेध करतो.. ज्या गांधींनी स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, आणि कुठकुठल्या फ्रीडमस्चा वगैरे पुरस्कार केला असे ऐकून आहे, त्या गांधींच्या जयंतीच्या दिवशी देशातला एक फार मोठा कष्टकरी वर्ग विनाकारण बेरोजगार राहणार हा विरोधाभास चीड आणणारा आहे.. मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो आणि त्यांची रोजीरोटी चालते.

बोलत होता मोबाईलवर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/10/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
बोलत होता मोबाईलवर
आरे त्या देवळात करुंन र्‍ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच. - सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्‍याला सांगत होता मोबाईलवर. "हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर. आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?

लघुसंदेशातील संकेताक्षरे

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 28/09/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्‍या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्‍याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्‍याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता. :D लवकरच, नंतर आलेल्या विविध संदेशांमधून, कळले की मी काढलेले अर्थ चुकीचे आहेत.

बदल

लेखक प्रभो यांनी रविवार, 27/09/2009 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच घरी आलो दसर्‍यासाठी.

आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !

लेखक दशानन यांनी रविवार, 27/09/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस ! ह्या वीराला शत शत नमन ! * सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य ! ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!

नियती....

लेखक दशानन यांनी बुधवार, 23/09/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
* केव्हा पासून मी असा वेड्यासारखा पळत आहे, किती दिवस.. किती महिने.. किती वर्ष झाली.. खोल दरीतून डोंगर माथ्यापर्यंत... माथ्यावरुन खाली पायथ्यापर्यंत... रानातून.. जंगलातून.. रणरणत्या उन्हातून असाच सुसाट वेड्या सारखा पळत आहे मी.. ना थकलो.. ना हरलो. का ? कश्यासाठी... माझं गाव तर केव्हाच मागे राहिले तरी देखील मी असा हा वेड्यासारखा धावत आहे... मला ते हवे आहे ते... जे समोर उंच डोगरावर दिसत आहे... जे चमकत आहे तेच तेच ते हवे आहे मला. किती ही कष्ट करायला लागू दे मला ते हवेच आहे.. अरे हे कोण माझी वाट अडवून उभे आहे... जाउ द्या हो मला का उगाच माझी वाट अडवत आहात तुम्ही... मला ते हवे आहे...