Skip to main content

जीवनमान

पश्चिमेचा गार वारा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 30/08/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस किती पटापट निघून जातात! नाही? इथे पिलाणीला येऊन महिना होत आला, कळलंसुद्धा नाही. सध्याच्या काळात इथे प्रचंड उकडतं. हवामानशास्त्रीय भाषेत बोलायचं, तर वातावरण उष्ण आहे आणि हवेत आर्द्रता आहे. त्यामुळे दुपारी अर्ध्या मिनिटासाठी जरी पंखा बंद झाला, तरी "घर्मस्नान" घडतं. आज मात्र रोजच्यापेक्षा थोडं थंड वाटलं. इथली सवय झाल्यामुळेही असेल कदाचित. संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्या खिडक्या उघडल्या तेव्हा मस्त गार वारा अंगावर आला. तसा तो रोजच येतो. पण आज तो जाणवला. अमेरिकेत माझ्या घरातल्या स्वयंपाकघराचं दार उघडं ठेवल्यावर असाच वारा यायचा पश्चिमेकडून. दोन महिन्यांपूर्वी मी अमेरिकेच्या घरातच होतो.

बदलाबदली !

लेखक भोचक यांनी गुरुवार, 27/08/2009 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्‍या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.

सूड - भाग २ (कथा संपूर्ण )

लेखक सागर यांनी गुरुवार, 27/08/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार रसिक वाचकहो, माझ्या "सूड्"कथेचा दुसरा भाग देण्यास थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. पहिल्या भागाला मिळालेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी कथानकात मूळ ढाचा न बदलता थोडेफार फेरबदल केले आहेत, ते कितपत यशस्वी झाले आहेत ते वाचकांवरच सोपवतो. माझ्या "सूड" या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग देताना आनंद होत आहे. तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाची अपेक्षा आहे.

चिंतातुराणां न सौख्यं, न मज्जा.

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 26/08/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराचं पाट्या टाकणं झालं आणि मी ऑफिस बंद करत होतो. तेवढ्यात फोन वाजला. "दत्ता. . मी मंदार. तू ऑफिसमध्येच आहे कां ?" मी म्हणालो " हे काय बंद करून निघतोच आहे. कां रे ?" तुझ्याकडे तासभर वेळ आहे कां ? हो आहे. कुठे जायचंय कां ? हो. जरा गप्पा मारंत बसू. कुठे ? भोलाकडे. वडा-पाव बर्‍याच दिवसांत खाल्ला नाही. च्यायला, नुसता वडापाव ? आणि वडापाव खायला तास कशाला लागतो? मला वाटलं तू 'कवी'मध्ये बसायचं म्हणतोयस. लेका . . . श्रावण चालू आहे. नेहमी पिणार्‍यांना श्रावण. मला नाही. तरीसुध्दा नको. तू भोलाकडे ये. मी निघतोय लगेच. मी भोला वडेवाला कडे पोहोचलो.

आई, तुला काही कळत नाही

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 17/08/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी एका कामासाठी लेकाला शेजारच्या गावाला जावे लागले. ड्रायवर नेहमीप्रमाणे मी. ४०-५० मिनीटांची ड्राइव्ह. वेळ घालवायला काय काडी टाकावी याचा विचार करत होते तेवढ्यात पाठच्या सीटवरून लेक ओरडला. "तू मला आठवण नाय केली. Now I am in trouble" "तुझ सेलफोन, आयडी,पाकीट वगैरे तू लक्षात ठेवायचस. आज काय विसरलायस? का फाईलच विसरलास?" माझं सुरू झालं. "सगळं घेतलय मी." "मग?" "जे. टी. ला परवा birthday च text करायच राहीलं. देवा!