Skip to main content

जीवनमान

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.

आउटस्टँडिंग

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/05/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच .. विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत , जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले.

नाते प्लेटॉनिक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 29/04/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी एक सुंदर कन्या कॅफे मधे आली. संगणकाबरोबर फोन पण चालु होते, कॅफेत आम्ही दोघेच असल्याने माझे कान सहजच तिकडे लागले होते. अंदाजे ४ थ्या कॉलला एक वाक्य कानावर पडले, "शट अप मॅन, माझे आणि त्याचे नाते प्लेटॉनिक आहे". आता ही काय भानगड आहे ते कळेना. क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला. दोन मुनीवर्य नजरसमोर होते. १. अवलिया. अवलिया ऑन लाईन नव्हते. २.गुर्जी. हे पण गायब होते पण भ्रमणध्वनी उपलब्ध होता. म्हणजे गुर्जीना विचारण्याशिवाय पर्याय नव्हता, एरवी मी व्यनी वगैरे करुन उत्तराची वाट बघतो पण आज फारच उतावीळपणा आला होता.

'वसंत' असाही..

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/04/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपली करडी दुलई गुंडाळून ठेवून सृष्टी वसंताच्या स्वागताला सज्ज झाली. इवलाली कोवळी ,लालसर पालवी फांद्याफांद्यातून उमटू लागली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निळ्याभोर आकाशाखाली पहाटेचे दवबिंदू पिऊन लुसलुशीत गवत बाहेर डोकावू लागले, त्यातूनच मग रानफुले डोलू लागली. चेरीचे वृक्ष मग नाजूक पांढर्‍या,गुलाबी फुलांनी मोहोरले. 'साकुरा' अंगणाअंगणात फुलू लागला तर मॅग्नोलियाच्या पांढर्‍या,गुलबट मादक अस्फूट कळ्यांनी फांदीनफांदी सजली. खट्याळ ट्यूलिप्सचे अर्धस्फुट कळे कोपर्‍याकोपर्‍यांवरच्या अंगणात दिसू लागले. सफरचंदाची झाडंही सफेद फुलांनी बहरली. एक सुवास वातावरणात कोंदू लागला.

महाराष्ट्र गर्व माझा

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी वीरांची रणभूमी जगात वेगळा महाराष्ट्र माझा शिवबा माझे दैवत भवानीची मला सोबत जोशात लढेन दर्याला हरवेन पंचगंगेचे पाणी कोल्हापूरी वाणी शत्रुंनो तलवार म्यान करा वाहतील रक्तांच्या धारा महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

सौजन्याची ऐशी तैशी...

लेखक शितल यांनी बुधवार, 22/04/2009 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यो आमचा वाडा... या असं हिकडून... वाईच थांबा पर... न्हायी,म्हनलं आमच्या वाड्यामन्दी यायच्या आधी एक गोस्ट इच्चारायची र्‍हायली... तुमच्या आंगी सौजन्य हाये न्हवं? मंग झालं तर... का सांगतुया की... आमच्या वाड्या मन्दी येकून बिर्‍हाडं म्हन्ताल तर खालच्या आंगाला पाच आन वरच्या अंगाला दोन. तुम्हासनी कंच्या आंगाच्या लोकासनी भ्येटायचं हाय त्ये आदुगर कळालं पाईजे म्हंजी म्या तुम्हासनी बराबर न्येतू की नाय त्ये बघा... तर बघा खालच्या आंगाच्या लोकांची गुन-इशेश सांगते... तर ह्ये हाय यकदम कोपर्‍यात राहानारं दिंडोरे कुटुंब... म्हनावं तर पाच माणसंच घरी नवरा बायको आनी दोन ल्येकी आन येक शेंबडा ल्योक...