साडीखरेदीची गोष्ट
बर्याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला.
मिसळपाव