Skip to main content

कला

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

लेखक वाचक यांनी गुरुवार, 05/03/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

मनाच्या कुपितले-मुलाखत

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 04/03/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दहावा लेख
मुलाखत - केदार कुलकर्णी
तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली.

माउंट रेनियर . .

लेखक सुक्या यांनी शनिवार, 28/02/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माउंट रेनियर : भौगोलिक स्थान: वाशिंग्टन राज्य, उत्तर अमेरिका. अधिक माहीतीसाठी इथे टिचकी मारा. मागे बर्‍याच दिवसापुर्वी माझ्या घरापासुन जवळच असलेल्या या निद्रीस्त ज्वालामुखी ला भेट द्यायचा योग आला. वर्षाचा बहुतेक काळ हा ढगांच्या चादरीखाली झाकलेला असतो.

इंदुरात 'लिटिल चॅम्प्स'

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते. सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.

श्रद्धांजली - व्हराडकार डॉ लक्ष्मणराव देशपांडे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 23/02/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत. मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...! -- तात्या अभ्यंकर.

मनाच्या कुपीतले -आयुष्यावर बोलु काही

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 18/02/2009 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा आठवा लेख
आयुष्यावर बोलु काही
लेख वाचण्यापुर्वी - हा लेख स्कॅन स्वरुपात आहे खरेतर हा लेख मी पुर्वीच लिहिलेला आहे तेव्हा तो परत टाइप करणे वेळेअभावी शक्य नव्हते म्हणून स्कॅन कॉपी देत आहे.

तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/02/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..! काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती! ती..! जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात!

ब्रम्हकमळ

लेखक रश्मी यांनी गुरुवार, 12/02/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
असं म्हणतात की ब्रम्हकमळ वर्षात फक्त एकदाच फुलते. पण आमच्याकडे मागच्यावर्षी पावसाळ्यात ५ ते ६ वेळा ब्रम्हकमळ फुलले. एकूण २७ फुले आली.

ईडीयट बॉक्स & बालिका बधु..

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/02/2009 05:29 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसुन कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते. टिव्ही मुळे पण नेमकं हेच होतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार दाखवल्या जातात आणि मग आपल्याला त्याच बरोबर आहे असं वाटायला लागतं. हल्ली एक कार्यक्रम सुरु झाला आहे बालिका बधु नावाचा कलर्स चॅनल वर.