Skip to main content

कला

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

उगाच रात्रीचा …दिवस ..वगैरे, करून…

लेखक निखिलचं शाईपेन यांनी रविवार, 24/05/2009 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
खच्च बावळटपणा खरं तर. म्हणजे वाईट झोप आलीये पण उग्गीच स्क्रीन समोर, रोजचंच झालंय च्यायला. मध्ये तरूण ला विचारले की २० एम एल ब्रॅंडी चढेल का ? तर म्हणाला की “चढेल, if you act!” म्हणुन आज १००+ एम. एल. घेतोय बाकी घसा दुखत होता म्हणून सुरु केलेली, ग्लासात पाण्यापेक्षा ब्रॅंडी जास्त अस्सेपर्यंत पोचलोय. मला खरच चढत नसावी, किंवा ऍज दे से … आय ऍम अ टॅंक… टॅंक. लिहायला बसलोय खरं पण काही डोक्यात नाहीये, लेखाचे नाव काय द्यावे त्यापासून ..काय लिहू ..कशाबद्दल कोणाबद्दल लिहू.. चिडचिड…नुसती.. पण…..

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे -- १ १) संगीत पुण्यप्रभाव व संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या दोन नाटकांची १९५० सालातली कोकणातल्या गुहागरातील जाहिरात. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दामले (नूतन पेंढारकर), मा दत्ताराम अशी मातबर ष्टार कास्ट! जाहिरातींवरून गुहागरातले दामले नावाचे कुणी वकील नाटकाची तिकिटं विकण्याचे काम पाहात असत असं जाहिरातीतून कळतं!

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..! १) ॐ भास्कराय नम: पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत.

बेसामे मुचो - एक शृंगारिक गाण्याची विविध रूपे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 11/05/2009 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने मला या "बेसामे मुचो" ("खूप चुंबने दे") गाण्याने पछाडले आहे. हे प्रथम ऐकले, ते आवडावे असे नाही. "अमेरिकन आयडल" या संगीतस्पर्धेत सँजाया मॅलकार (?संजय मालाकार?) याने मी ते गायलेले ऐकले, आणि अशा परिस्थितीत कुठलेही गाणे न आवडले, तर आश्चर्य ते काय? पुढे यूट्यूबवर शोधता दिसले, की हे गाणे अनेक कलाकारांना आपली छाप लावून गावेसे वाटले आहे. तसे हे गाणे फार जुने लोकसंगीत वगैरे नाही. हे गाणे त्या मानाने अगदी हल्लीहल्लीच १९४०मध्ये कोन्सुएलो वेलास्केस या मेक्सिकन पियाने-वादिकेने रचले (शब्द आणि संगीत दोन्हीही).

-"मी शिवाजीराजे....." दुबईत

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 06/05/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सुपरहीट सिनेमा-"मी शिवाजीराजे....." दुबईत येत आहे. हा सिनेमा ल्याम्सी प्लाझा (Lamcy Plaza), दुबई येथे ८ किवा १५ मे पासुन १ आठवडा दाखवीला जाईल. क्रुपया तुमचे वर्तमानपत्र किवा Gulf News e-Plus तपासा. Jay Hind, Jay Maharashtra!

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

लेखक अडाणि यांनी मंगळवार, 05/05/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी. १. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो. २. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन ३.

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 02/05/2009 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.) तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.

दुनियादारी - माझ्या नजरेने !

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.