लेखकपिंपातला उंदीरयांनी मंगळवार, 15/01/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.
लेखककिसन शिंदेयांनी रविवार, 06/01/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय!
आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते.
लेखकजयवीयांनी शनिवार, 05/01/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ.
ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला.
नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !!
लेखकजयवीयांनी सोमवार, 31/12/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :)
नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :)
लेखकरमतारामयांनी रविवार, 23/12/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
'कट्टा' हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो तो कॉलेजजवळील चहाच्या टपरीवर जमलेला विद्यार्थ्यांचा घोळका.कधी चहाची टपरी नसेल तर कॉलेजच्या आवारातील एखाद्या वृक्षाचा पार असेल, कॉलेजच्या दाराजवळील कुंपणाचा पट्टा असेल. जिथे जिथे चार टाळकी बसतात नि कुटाळक्या करतात तो कट्टा. कटिंग चहा नि क्रीमरोल च्या साथीने मॅथ्स-थ्री मधे झालेल्या काशी पासून अमीर खानच्या टूथब्रश मिशीपर्यंत, कुठल्याशा चित्रपटातील गाजलेल्या किस् पासून आपापल्या आवडत्या मिस पर्यंत वाट्टेल त्या विषयावर तासन् तास काथ्याकूट करत बसण्याची जागा.
लेखकपिंपातला उंदीरयांनी गुरुवार, 20/12/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्या एका परिवाराभोवती फिरते.