Skip to main content

कला

रंगात रंगलो मी - रंगाविना

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/05/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मित्रहो, नव्या तंत्रज्ञानाच्या युगाने आपल्याला अनेकविध साधने आपल्या मनोरंजनासाठी दिली, आपल्या आनंदाच्या निधानाच्या निकट जाण्याची संधी दिली. संगणक क्षेत्रात सहा फूट बाय चार फूट बाय तीन फूट या आकाराच्या संगणकावर कामाची संधी मिळाली.पण तेथे आजच्या हपिसांसारखी " चंगळ" करण्याची संधी नव्हती. एकाच रंगाचा मॉनिटर, एकच ओळ दुरूस्त करता येणारा " एडीटर" व आठ एम बी च्या दोन हार्डडिस्क ई च्या दिव्य कॉनफिगरेशन वर काम करता करता पी सी एक्स टी आला. मग क्विक बेसिक मधे रनिंग लाईट , गणपतीची आरास ,बीप चा वापर करून जन गण मन ई. उद्योग इतकी तरी " चंगळ" वाट्याला आली. मग आपल्या घरी पी सी आला रे आला .

टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप.

लेखक सौरभ उप्स यांनी सोमवार, 21/05/2012 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, टाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप मी तयार केला त्याबद्दलचा अनुभव आणि तो कसा केला याबद्दल थोडेफार.. माझ्या लहानपणी मला सांभाळलेल्या व् आमच्या शेजारच्या जोशी काकूंनी माझी चित्रे लहानपणापासून पाहिली होती, आणि सध्याच माझ क्षेत्र ही कलेतच आहे हे त्यांना माहित होत....

गर्भ-बीज : मंटोंचा एक कथासंग्रह

लेखक यकु यांनी रविवार, 20/05/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ११ तारखेला मंटोंची जन्म शताब्दी येऊन गेली आणि वर्तमानपत्रांची संपादकिय पाने, वेगवेगळे ब्लॉग, मराठी संकेतस्थळे वगैरे ठिकाणी सआदत हसन मंटो या अवलिया लेखकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले.

अजिंठा

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 12/05/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला... लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला... बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा.

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

झ झ झ झ झोपडीत

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 09/05/2012 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
झझझझ झोपडीत चचचच चारपाई झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे कुकरू कुकरू हू तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना कुकरू कुकरू हू टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो...

मुख न लपवून जगा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 09/05/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!

According To Accordion

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 08/05/2012 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त होतं ते Accordion या जादुई वाद्याच्या १८३व्या वाढदिवसाचं... मा.चौराकाकांच्या मुळे मी व मोदक (दिनांक ६ मे रोजी) या एका अभूतपूर्व कार्यक्रमाचे सह-भागी होऊ शकलो...होय सहभागीच..!

फोटोशॉप किडे - ३ (फोकसिंग आणि polygonal lasso tool)

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 04/05/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप किडे - १ फोटोशॉप किडे - २ नमस्कार.. आजच्या भागात आपण polygonal lasso टूल चा एक उपयोग पाहणार आहोत polygonal lasso हे टूल.. selection साठी वापरल जात , इखाद्या फोटो वरचा आपण आपल्याला हवा तो भाग आपण या टूल ने सिलेक्ट करू शकतो फोकसिंग ... फोटोग्राफी मधला अत्यंत महत्वाचा भाग .. फोकसिंग मुळे फोटो खूप उठून दिसतो..