एक कविता हरवलेली ... सापडली :)
शाळेत शिकलेल्या कविता, कोणतीतरी त्यापैकी एक मनात कुठेतरी घर करून राहिलेली आणि खूप खूप आवडलेली, भावलेली. काही वर्षांनंतर ऐकली की मनाला आणखीच जास्त भुरळ घालणारी. मला वाटत आपल्या प्रत्येकाची अशी एखादी 'खास' कविता असेलच. माझीही होती. शाळेत खूप खूप आवडलेली म्हणून माझ्या एका मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात मला लिहून दिलेली. पण नंतर नोकरी-संसार या सगळ्या पसाऱ्यात हरवून गेली. दोन-चार ओळी लक्षात होत्या पण पूर्ण नीट अशी आठवेच ना.
शोधली म्हणा, गुगल करा काहीही सापडतं ... पण नेमकी हीच नाही मिळाली, का मलाच शोधता आली नाही काय माहित.
मिसळपाव


ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले.