उफ्फ... ये गालिब!
3
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.
जीवनशाळांच्या मुलांचं दरवर्षी एखादं संमेलन भरत असतं. त्याला नाव असतं 'बालमेळा'. त्यात या शाळेतील मुलं विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असतात. त्याजोडीनेच त्यांचा क्रीडामहोत्सवही असतो.
यंदा हा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील आमलीबारी येथे, गुरूवार दि. २ फेब्रुवारी २०१२ ते शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१२ या दिवसात होणार आहे. या निमित्ताने नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे सर्वच सुहृदांना आमंत्रण दिले आहे.