क्रांतीतै चे अभिनंदन
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे.
पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
मिसळपाव
साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर
कृती:
रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.