पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)
नमस्कार मंडळी,
बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची.
सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.
मिसळपाव
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.