माझी पहिली कादंबरी ................
रसिक आणि मिसळपावकर मित्र हो .................
माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ" ही नुकतीच प्रकाशित झाली(मनोरमा प्रकाशन).
सत्य आणि आभास ह्यांच्या सीमारेषा जेव्हा पुसट होतात, तेव्हा जाणीव आपल्याला नक्की काय दाखवतेय हेच कळेनासे होते. बौध्द वैज्ञानवाद्यांच्या मते, इंद्रियांना येणारे अनुभव व ज्या वस्तुंचे अनुभव येतात त्यांमध्ये भिन्नता नसते. आकाशात दिसणारा चंद्र व मी चंद्र पाहिला हे मनाला होणारे ज्ञान, एकच आहे. वेदान्तातला दृष्टि-सृष्टिवाद ही असाच काहीसा आहे.
मिसळपाव
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं.
(वरील दोन समांतर पाठ्ये जमल्यास एकत्र वाचावीत - आधी एक, नंतर दुसरे, असे नको - अशी वाचकांना विनंती आहे. ज्यांना हे जमवायचे नसेल, त्यांनी असे मानून विचार करावा : या दोन पाठ्यांची श्राव्य जुगलबंदी आहे. ती ऐकण्यासाठी