लेखकमूकवाचकयांनी रविवार, 07/11/2010 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नॉस्टॅल्जिक आठवणी बहुतांशी शास्त्रीय वाद्य संगीताच्या आहेत. कधी काळच्या कित्येक मैफली ध्वनीचित्राफितीसारख्या मनात कोरलेल्या आहेत. २९ डिसेंबर २००२ ची उ. विलायत खान साहेबांची सवाई मधली (शेवटची) मैफल त्या पैकी एक.
उ. विलायत खान हे माझं शास्त्रीय वाद्यासंगीताच्या क्षेत्रातील दैवत. सतार या तंतू वाद्याच्या रचने मध्ये आणि ती वाजवण्याच्या तंत्रामध्ये महत्वाचे बदल करून तिला 'गायकी अंग' देण्याचं आणि 'विलायातखानी बाज' प्रस्थापित करण्याचं 'अवतार कार्य' च त्यांनी केलं. निव्वळ सतारच नव्हे, तर एकूणच शास्त्रीय वाद्य संगीताच्या प्रचलित मर्यादा ओलांडणारी ती क्रांतीच होती.
लेखकमेघना भुस्कुटेयांनी गुरुवार, 04/11/2010 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
’रेषेवरची अक्षरे २०१० - अंक तिसरा’ प्रसिद्ध झाला हे जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.
यंदाचा अंक तुम्हांला इथून उतरवून घेता येईल. हा अंक ब्लॉग स्वरूपातही उपलब्ध आहे. (http://reshakshare.blogspot.com/) काही बदल, सुधारणा आवश्यक वाटल्यास आवर्जून कळवा.
ही दिवाळी तुम्हांला आनंदाची, समृद्धीची आणि समाधानाची जावो हीच शुभेच्छा!
लेखकयकुयांनी बुधवार, 03/11/2010 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीत: सूर तेच छेडिता
मूळ गीत एका प्रियकरानं प्रेयसीसाठी म्हटलेलं आहे. गमंत अशी असते की बहुतांशी लोकांची प्रेयसी जेव्हा सुटते, तेव्हा त्यांना सिगारेट ही नवी प्रेयसी हमखास मिळत असते. या कल्पनेवर या गाण्याचे शब्द सहज इकडे तिकडे ठेऊन पाहिले आणि तयार झालं धूर तोच काढीता...
लेखकविसोबा खेचरयांनी शनिवार, 30/10/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी,
आमचं दैवत असलेले, मराठी संगीत रंगभूमीचे सम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या जीवनावर प्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितिन देसाई हे चित्रपट निर्मिती करत आहेत.
ही अत्यंत मोलाची कामगिरी ते करत आहेत, त्याकरता त्यांचं अभिनंदन व चित्रपटाकरता अनेकानेक शुभेच्छा..
आज हिंदी रजतपटाच्या दुनियेत नितिन देसाईंनी कला-दिग्दर्शक म्हणून आपल्या उत्कृष्ट कामाचा जो ठसा उमटवला आहे त्याचा कुठल्याही मराठी माणसाला अभिमानच वाटावा..
लेखकपरिकथेतील राजकुमारयांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.
लेखकमृत्युन्जययांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले.
सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे.
असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.