शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या
"काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले.
"हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले
"ऑल ओके?"
"हो" तोच स्वर
"ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला.
"कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले.
"वाटलंच होत मला!
मिसळपाव
खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती.
तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं.
आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न.
तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला.
शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली.
पण गोष्टी लपत थोडीच असतात?
कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात.
असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला?
आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा .
नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला.
"पूरा शहर खंडर हो चुका है. कई बिल्डिंगोंमे आग सुलग रही है. धुवा धुवासा है यहा. सब बरबाद हो गया जनाब.. ओव्हर"
"हिम्मतसे काम लो. खूदा है अपना.. ओव्हर"
"जनाब, शहरकी दक्षिणी हिस्सेमे हलचल नजर आ रही है. हुकूम करो..ओव्हर"
"आगे बढो. मै बॅकअप ट्रूप भेज रहा हू.. ओव्हर"
"ठिक सामने दो छोकरीया दिख रही है. चलती जा रही है रस्तेसे.. ओव्हर"
"बचाओ उन्हे. कहिसे भी गोली आ सकती है.. कहीसे बंम्ब गिर सकता है.