पावडर
(ह्या कथेत इंटरनेटच्या एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली आहे. ही कथा वाचत राहा, तिचा आनंद घ्या पण चुकूनही ह्या जगाची ओळख स्वत: करून घ्यायचा प्रयत्न करू नका हीच कळकळीची विनंती.)
****************************************************************************
गोष्ट तशी फारशी जुनी नाही. सहा आठ महिन्यांपूर्वी मी माझे गुजरात राजस्थान मधले काम संपवून नुकताच पुण्यात स्थानापन्न झालो होतो. गणपती संपत आले होते, अचानक तेव्हाच एके दिवशी आमचा मोबाईल खणखणला. बघतो तर कश्यप साहेबांचा फोन. कश्यप साहेब गेल्या वर्षीच पुण्याच्या सायबर क्राईमला जॉईन झाले होते.
मिसळपाव
...
बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे.
दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...