कोपरयातलं रोपट.
आमच्या कॉलेजला नुकत्याच सुट्टया लागलेल्या होत्या. सगळं चंबुगबाळ घेऊन गावी निघालो होतो. पेपर संपल्यानंतरची खुशी काय वर्णवावी! रिझल्ट लागेपर्यंत का होईना ती टिकून राहते.
बसस्थानकात अत्यंत स्वच्छ, मोकळी बस मझ्यासाठी उभी होती. 'प्रवासी हेच आमचे दैवत' हे सिद्ध करणारा तेजस्वी,हसरया चेह्रयाचा कंडक्टरही लाभला होता.कंदमुळे खाऊन या कंडक्टरने कोणालाही कंप सुटावा अशी तब्येत मिळवली असेल असे वाटले. अदबीने तिकीट फाडुन माझ्याकडे दिले गेले .नेहमीप्रमाणे अखिल भारतीयांना सतावणारा सुट्टया पैशांचा प्रश्न त्यालाही भेडसावत होता हे कळाले.
मिसळपाव