Skip to main content

कथा

ऑपरेशन भाग 2

लेखक समीर१२३४५६ यांनी शनिवार, 02/01/2016 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 वरुन पुढे- सर्वांनी रोहितची समस्‍या जाणून घेण्‍याचा बराच प्रयत्‍न केला. ब-याच जणांना असे वाटायचे, की श्‍वेताच्‍या बेताल वागण्‍याने तो चिडचिड करतोय, तर काहींच्‍या मते दुसरे कोणते कारण होते. रोहितच्‍या सिनीअर मि.अंकोलानी त्‍याला विश्‍वासात घेऊन त्‍याची समस्‍या जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. रोहितला आपल्‍या वैदयकिय पेशामुळे स्‍वतःच्‍या खाजगी आयुष्‍याकडे लक्ष देता येत नव्‍हते. तशातच मि.अंकोलानी त्‍याची पगारवाढीची मागणीही धुडकावून लावली होती, त्‍यामुळे तर तो अधिकच चिंतित असायचा. रोहित अश्विनची मात्र जिवापाड काळजी घेत असायचा, तोच त्‍याच्‍या जगण्‍याचा आधार होता.

डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन

लेखक सुधीर वैद्य यांनी शुक्रवार, 01/01/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन / २०-०६-२०१४ / पृष्ठे १५७ / रुपये १७०/- / कथा संग्रह: स्त्री ची अनेक रूपे असतात. वयानुसार हि रूपे बदलत जातात, तसेच त्या स्त्रीची मानसिकता, जगाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आमुलाग्र बदलते. लेखिकेने अश्याच वेगवेगळ्या रूपातील स्त्रीयांचा व त्यांच्या बदललेल्या मनाचा - आयुष्यातील भूमिकेचा मागोवा घेतला आहे. कथा संग्रहात ११ कथा अहेत. ह्या सर्व कथा मासिकात ह्यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय आहेत. परंतु खालील कथा खूप लक्षवेधी आहेत …. डेट, पैलतीरावर, एका मोकळ्या श्वासासाठी.

लकी

लेखक मीन यांनी गुरुवार, 31/12/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आई गंऽऽ! खूप कंटाळा आलाय आज. खूप दिवस काही काम केलं नाही. कुठे बाहेर फिरायलाही गेले नाही. अश्शी एका जागी बसून आहे. मी मुळात आळशी नाही बरं का! खूप कामसू आहे. लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. कुठे काही वाईट घडलं की जशी काही मला सूचनाच मिळते. डोळ्यांसमोर लाल वर्तुळं दिसतात. कानात भोंगे वाजू लागतात. एक प्रकारचा सिक्स्थ सेन्सच म्हणा ना. मग मी अगदी धावपळ करुन लोकांच्या मदतीला जाते. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू? मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केलीये, त्या सर्वांवरील संकट टळून ते अगदी सुखरुप बचावले आहेत. म्हणूनच माझे मित्र, नातेवाईक सगळेजण मला ‘लकी’ म्हणतात. माझे खूप लाड करतात.

ऑपरेशन

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 31/12/2015 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज रोहित हॉस्‍पीटलमधून लवकर घरी अाला, त्‍याची तब्‍येत ठिक नव्‍हती. येताक्षणीच त्‍याने आपला राग श्‍वेतावर व अश्विनवर काढायला सुरवात केली. श्‍वेता ही रोहितची दुसरी बायको होती, तर अश्विन त्‍याच्‍या पहिल्‍या बायको रंजनाचा मुलगा होता. होता.काही महिन्‍यांपूर्वी एका अपघातात रंजनाचा मृत्‍यु झाला होता, तेव्‍हापासून तोच आश्विनचा सांभाळ करत होता. आईच्‍या सांगण्‍यावरुन त्‍याने दुसरे लग्‍न केले होते,परंतू आल्‍या दिवसापासून त्‍याची दुसरी बायको श्‍वेता अश्विनचा छळ करीत होती, ती त्‍याला दिवसभर रगाडयाला लावत असायची आणि धड त्‍याला काही खायला ही देत नसे.

सोशल नेटवर्किंग (भाग १)

लेखक लाडू. यांनी गुरुवार, 31/12/2015 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच अंधेरी-विलेपार्ले भागात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित कथा. पण सर्व पात्रे काल्पनिक आहेत. (कथा अन्यत्र पूर्वप्रकाशित) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मयंक सकाळी उठतो तो बेडवर कुठेतरी असलेला फोन चाचपडतच. ही त्याची नेहमीची सवय. रात्री डोळे आपोआप बंद होईपर्यंत फोन वर chat. मग फोन पडतो कुठेतरी. तो सकाळी उठल्या उठल्या हातात घेऊन मग बाकीची कामे. दिवसभर २४ तास मोबाईल हातात हवाच. चार्जिंग करणार तेव्हाही त्या फोनला आराम म्हणून नाही. online असण्याच जणू व्यसनच लागल होत.

शोध राजीव हत्येचा भाग १

लेखक गुल्लू दादा यांनी बुधवार, 30/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .

शेवटची ट्रेन

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 30/12/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची ट्रेन शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला...

‪‎मी उत्सवला जातो‬ (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 29/12/2015 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ____________________________________________________________________________________ खाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.

१५०

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 28/12/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर. त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज.

‪मी उत्सवला जातो‬ (भाग 3)

लेखक Anand More यांनी सोमवार, 28/12/2015 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ____________________________________________________________________________________ हिने पंचनामा करणाऱ्या हवालदाराच्या आणि निवाडा करणाऱ्या न्यायाधीशाच्या एकत्रित अविर्भावात माझी खरेदी बघितली. तिळाचे तेल घरात होते आणि मी सूट आहे म्हणून घेतलेले तेल तिच्या नेहमीच्या दुकानदारापेक्षा महाग होते. मी उगाच स्टॉलवाल्याकडे रिफील पॅक नव्हता, जास्त बाटल्या नंतर साठवणीला कामाला येतील वगैरे युक्तिवाद करून पाहिले. त्यावर तिने मी प्रत्येक बाटली चाळीस रुपये जास्त देऊन घेतली आहे असा हिशोब लावून दाखवला. मी उसनं अवसान आणून तिला, "तू कोळसा घोटाळ्यासारखे आकडे फुगवून सांगतेस," असे कायच्या काय बोललो.