Skip to main content

कथा

एक होतं गाव .....

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 16/10/2015 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
गावाचं नाव विचारू नका. पण गाव अर्थातच कोकणातलं. तिथल्या प्रत्येक गावाची कुठची ना कुठची गोष्ट असतेच. तीही साधीसुधी नाही तर भुताखेताची. ही कथा सुद्धा त्यापैकीच. आता तुमचा विश्वास नसेल तर नका बापडे ठेऊ . काही सक्ती नाही . पण गोष्ट वाचायला काय जातं ? इथे पूर्वापार चालत आलेली जमीनदारीची परंपरा होती आणि त्या सोबतीनं नांदणारी गरिबी. एक प्रकारची पिळवणूकच होती ती. कदाचित काही जण सन्माननीय अपवाद असतीलही. पण ते खरोखर अपवादापुरते. जवळपासच्या पंधरा वीस गावांची देखभाल(?) करण्याची जबाबदारी यांच्याकडे असे. त्यांचा मोठ्ठा वाडा असे.

हिशोब

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/10/2015 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
पोटापाणयाची मोठी चिंता होती मला.पैशासाठी काय पडेल ते करणं भागच होत त्यामुळं,त्यांचा तो प्रस्ताव मी ताबडतोप मान्य केला.आणि सरकारी दवाखान्याच्या व्हरांड्यात टाकलेल्या अमरला आणलं मी ऊचलून घरात.एड्स पेशंटला कोण थारा देणार? तो मी दिला.पैशाची चिंता करू नका ते बोलले,आणि 5000 रु.

धरसोड

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/10/2015 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज नानाआजोबा आले. तालुक्याला असत्यात. आज्जीचे कायतरी भाऊ हायेत ते. आजोबा आले की आई मला काम सांगणार. पल्याडच्या गल्लीतल्या वाण्याच्या दुकानातनं कापी आणायची. हे आजोबा च्या पीत न्हाईत, कापी पितेत. “आजोबा, तुमी चा का न्हाई घेत? काय हुईल का तुमाला? ” म्या उगं इचारलं. “ बाळ अंजली, बापूजींनी सांगितलं देशासाठी थोडा त्याग करा. तेंव्हापासून चहा सोडला.” आजोबा म्हन्ले. भौतेक ते गांधी जैंतीवाले बापूजी असत्याल. कदी मीठ घ्या म्हन्तेत, कदी चा सोडा. आजोबा चा सोडले, तेचा बापूजींना काय उपेग? असंल कायतरी.

माया

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/10/2015 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
माई कितीतरी दिवस अंथरूणाला खिळलेल्या आहेत. शकू त्यंाची सेवा करतेय,त्यांचा हिडीसफिडीस पणा सहन करत. पण आज कदाचित शकू येणार नसावी,मनातल्या मनात त्या म्हणाल्या. “फोटू काडायला जायचंय सगळयानी ऊद्याच्याला,तांबडी साडी मातूर पायजे“ शेजारची कामवाली शकुला कांहींतरी सांगत होती. देव बसणार,उद्या पहिला दिवस, वार मंगळवार म्हणून लाल रंगाच्या पोषाखात कामवाल्या ग्रुपचा फोटो घेणार, आणि परवाच्याला पेपरात छापणार, “दुपारी दोन च्याला जायला पायजे“ त्यंाची कुजबुज माईंच्या कानावर आली होती. पण शकू नेहमीप्रमाणं कामावर आली होती.नेहमीचंच जुनेरं अंगावर. “ तूला जायचं नाही?“ माई “

टेडी-१ (भयकथा)

लेखक एकजटा अघोरी यांनी सोमवार, 12/10/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
अवघ्या ४ वर्षांची दिया आणि तिची आई वीणा कोर्टातून बाहेर पडल्या. वीणा थोडी धुसफुस करत होती, दियाला जवळजवळ खेचतच चालत होती. दुरुन तिचे वडील दुस-याच कुठल्यातरी स्त्रीबरोबर जाताना दियाला दिसत होते. तिच्या बालबुद्धीला याचं काही आकलन होत नव्हतं. अलिकडे पप्पा मम्मी सारखे भांडताहेत याची तिला जाणीव झालेली होती. पण हे सगळं काय असतं याचं मात्र तिला कोडं पडलेलं होतं. तिच्या वडिलांनी तिच्या आईला हाताने तीनची खूण केली. दर तिस-या रविवारी तिचे वडील तिची भेट घेऊन तिच्याबरोबर वेळ घालवू शकणार होते, याची ती खूण होती. कोर्टानेच तसं निकालात नमूद केलेलं होतं. दियाच्या आईचा नुसता संताप संताप झाला ते बघून.

खपले जाल !!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 11/10/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चवदार तळ्याच्या काठी साधारण चार बदके बसली होती. पाण्यात मगरींचा सुळसुळाट होता. त्यातल्या एका बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो दुसऱ्या काठावर पोहोचला. तिकडुन त्याने या मागच्यांना खुण केली. मग दुसऱ्या बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो पाण्याच्या मध्यभागी आला. एक बेडूक काठावरुनच या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन होता. मग त्यानेही डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत त्याने दुसऱ्या बदकाला पाण्याच्या मधोमध गाठले. आणि त्याला म्हणाला, "हे बदकदादा, या पाण्यात भयंकर मोठ्या अशा मगरी आहेत. एकतर तू पाण्यात ऊतरून चुक केली आहेस.

लालीची गोष्ट भाग ४

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ लाली आयुष्यात दुसऱ्यांदा रस्त्यावर आली होती. यावेळी पूर्ण एकटी. चालत चालत ती एका बस स्टोप जवळ पोहोचली आणि तिथेच बसून राहिली. तिला पुढे काय कराव सुचत नव्हत. थोड्याच दिवसात तिचा रिझल्ट लागणार होता. तिने स्वतः कमावलेले थोडेफार पैसे होते तिच्याकडे. पण आयुष्य बघितलेल्या लालीला याची कल्पना होती की या तुटपुंज्या कमाईवर काही होण शक्य नाही. आणि मग तिने निर्णय घेतला. ती जिथे काम करत होती त्या madam च्या घरी ती जाऊन पोहोचली. तिला रात्रीच्या त्या वेळेस बघून त्यांना आश्चर्य वाटल.

लालीची गोष्ट भाग ३

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ "रंगा आपण कुठे जातो आहोत? दामले सर माझी वाट बघत असतील रे गेटकडे." रंगाचा हात धरून धावत असताना लाली म्हणाली. रंगाला मात्र तिला उत्तर देणे जरुरी नाही वाटले नाही. तो तिला घेऊन अंधाऱ्या गल्ल्या पार करत भराभर चालत होता. लाली पुरती गोंधळली होती. ती फक्त चालत होती. किती वेळ ते दोघे चालत होते त्याची तिला कल्पना आली नाही. पण अचानक रंगा थांबला. तो एक ट्रेनचा मोडकळीला आलेला डब्बा होता. "वर चढ." रंगा लालीला म्हणाला. आणि स्वतः वर चढला. लाली त्याच्या मागोमाग वर चढली.

लालीची गोष्ट भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ लाली थोडी हिरमुसली. पण तिचा तिच्या माईवर पूर्ण विश्वास होता. ती बर म्हणाली आणि शीलाचा हात सोडून संस्थेच्या दारातून आत गेली. लालीला वाटल होत की निर्मला ताई तिला जवळ बोलावतील तिच्याशी बोलतील. पण तस काहीच झाल नाही. ती रात्र नेहेमीप्रमाणे गेली. आणि मग त्यानंतरच्या २-३ रात्री देखील. पण ३ दिवसांनंतरच्या रात्री निर्मला ताईंनी सर्व मुलांना एकत्र केल आणि विचारल;"कोणा-कोणाला रात्र शाळेत जायचं आहे? त्यांनी हात वर करा बघू. लालीला खूप आनंद झाला. तिने लग्गेच हात वर केला. तिथेच एक अनोळखी थोडे म्हातारेसे आजोबा बसले होते.

लालीची गोष्ट भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/10/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ रोज कचऱ्याच्या पेटीच्या मागच्या रिकाम्या जागेत झोपताना लालीच्या मनात एकच विचार यायचा..... अजून किती दिवस? माईला विचारून विचारून लाली थकली होती. माईच एकाच उत्तर होत; "एक दिवस नक्की लाली बेटा; एक दिवस नक्की! मी पण वाट बघते आहे.!" जेव्हापासून लालीला आठवत होत तेव्हापासून तिची माई तिला संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला त्या कचरा पेटीच्या मागे आणून बसवात असे आणि सकाळी ८ नंतर येऊन घेऊन जात आसे. लालीबरोबर सुखी आणि रंगा पण असत. सुखी तशी मोठी होती. साधारण पाच एक वर्षांनी मोठी असेल लालीपेक्षा. काळी सावली सुखी लालीवर मनापासून प्रेम करायची.