एक शोध.. एक गुण....
विजय, प्रकाश, प्रसाद आणि राजेश लाहानपणापासूनचे मित्र. अगदी शाळे पासूनचे. ज्या वयात मैत्री फ़क्त मैत्रिसाठी असते. तिला कोणतेही कारण चिकटलेले नसते; त्यावयातले मित्र. पुढे जरी चौघांचेही मार्ग बदलले तरी ही शाळेतली मैत्री अतुट राहिली होती.
विजयने कायद्याचा अभ्यास केला आणि पुढे हायकोर्टात जज्ज झाला. प्रकाशने चार्टड अकाउंटेंसी सुरु केली होती; आणि आता तो सरकारचे अकाउंट्स बघत होता. मोठ्या पोस्टवर होता तो. प्रसादने बराच प्रयत्न केला शिक्षण घेण्याचा. पण त्याला शिक्षणात गोडी नव्हती. शेवटी त्याने त्यांच्या लोनावळयाच्या घराचा कयापालट करून तेथे लॉजिंग बोर्डिंग सुरु केले.
मिसळपाव