Skip to main content

कथा

दिन्याचा राजा

लेखक म्हया बिलंदर यांनी शुक्रवार, 27/02/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिन्याच्या राजाला काळी प्यांट इन केलेला शर्ट घालून एका उंच स्टुलावर चढून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घराच्या पत्र्यावरून काढताना पाहून मजा वाटली. दुसरा कोणी असता तर लक्ष्य गेलं नसतं पण हा दिन्याचा राजा होता दिन्याचा राजा. हा तसा माझ्या हून वयाने लहान. आम्ही घर बदलून ह्या वस्तीत येऊन नुकतेच राहू लागलो होतो. नवे मित्र बनवत होतो. आमच्या क्रिकेट खेळायची जागा म्हणजे दारा समोरून जाणारी वाट. तिच्या शेवटी भंगारचा धंदा करणार्‍या खान अंकलचं घर आडवं गेलेलं. त्याच्या भिंतीला लागला की सिक्स. सगळी घरं बैठी.

म्हण (शतशब्द्कथा)

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 27/02/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?'' नाही बेटा . ''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?'' बघू . ती म्हण आहे, म्हण . ''काय म्हणू?''' अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात. लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं . ''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?'' तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो. *** जयाकाकू आलेल्या. सारखं बोलतच रहातात .

खुशबू (भाग ८)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 26/02/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ तो संध्याकाळी निवांत बालगंधर्वपुलावर रेलींगला टेकून बसला होता… खांदा मानेचं धनुष्य ताणून, बोटांना सिगरे

गूढ कथा: "शिकारी रात्र!"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 26/02/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्र उलटून गेलेली असते. वातावरणात खूप थंडी असते. एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो. बैलगाडी हाकणारा (नायबा) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (होयबा) म्हणतो, "या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस (बाॅर्डर) येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल." होयबा म्हणतो, "मी हे मानत नाही.

कलियुग..... एक लघूकथा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 25/02/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
कलियुग....... रस्त्याच्या पलिकडचा डोंगर बघताच सगळे खुष झाले. दाट गर्ड झाडी व आकाशात उंच उठणारे झाडांचे शेंडे, त्याच्यावर कापूस पिंजल्यासारखे ढग व त्यावर पडणारे सोनेरी किरण.....मस्तच. थोड्याच वेळात डोंगरावरुन अंधार खाली उतरला व गावात दिवे लागले. आमचा गाव म्हणजे कोकणातील निसर्गाचा व माणसांचा एक उत्कृष्ट नमुना! शहरातील गोंगाटाला कंटाळून आम्ही मित्रांनी महिनाभर गावी मुक्काम टाकण्याचा निश्च्य केला होता व पारही पाडला होता. त्याचेच फळ आम्ही आत्ता चाखत होतो. ठरलेल्या नियमानुसार सगळ्यांनी आपापले सेलफोन बंद ठेवले होते.

खुशबू (भाग ७)

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 25/02/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ आज एक नवीन दिवस उजाडला,ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती वाट पाहत होती.

खुशबू (भाग ६)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 24/02/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ ५ वर्षापूर्वी सकाळच्यापारी मिरज जंक्शनमधे नेहमीप्रमाणे वर्दळ... रेल्वे कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गडबड...

मोबाइल रिचार्ज

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 24/02/2015 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
 'बघ तो नबंर ...नाइन. .टू. .थ्री फोर...सेवन' 'बरोबर  अगदीच बरोबर, हे तीच्या चुकीचा नबंर ?', 'छे हो मी आसे करणारच नाही..', 'होतात हो चुका होतात. ..काका. .पण आसे घाबरू नका', 'घाबरू नका काय?

राँग नंबर : अंतीम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/02/2015 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
रॉंग नंबर : मागील कथानक तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती.

खुशबू (भाग ५)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 23/02/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ 'अरे हरदीप आज नयी बाइक' 'हा पाजी, आज वो कनद्दा से आई सुसान, मेरे नाल आई, अपनी बाइकको ग्राउंड पे छोड, उपरसे अपनी टीशार्ट, जीन्स, सारे कपडे उतार कर ग्राउंड पे फेक देके, बोली, हरदीप- I am offering you ANYTHING you want !' 'तो तुने क्या किया' 'क्या करता पाजी, बाइक उठाके चला आया ' 'अच्छा किया हरदीप, वैसेभी वो जीन