Skip to main content

कथा

टेंडर (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 17/03/2015 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळच्यान साहेब खुशीत होते. फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं. सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले. ''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई. तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे. त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची. सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''. *** महिना निघून गेला रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच! सायबानं घेतलंन सगळ्याना .

मालती-माधव...एक लघुकथा...इथेच पूर्ण केली आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मालती-माधव... भाटगरच्या त्या अथांग जलाशयाच्या काठावर मी माझ्या गाडीला टेकून उभी होते. थोड्या अंतरावर एका सिमेंटच्या बाकावर एक वृद्ध स्त्री म्हणजे माझी मालतीआजी डोळे मिटून मागे टेकून बसली होती. तिच्या अंगावर उगाळलेल्या चंदनाच्या रंगाची साडी होती. तिने डोक्यावरुन पदर घेतला होता. त्या साडीचे मरुन रंगाचे काठ मागेच असलेल्या लालचुटूक रंगाच्या फुलांना फिके पाडत होते. आजवर मी तिला याच रंगाच्या साडीत पाहिले होते. पण त्याने काय फरक पडला असता ? तिच्या खानदानी सौंदर्याचा प्रभाव समोरच्यावर सहज पडत असे. मालतीआजी जर कधी बोलली तर मात्र तिच्या विद्वत्तेचा अंदाज समोरच्याला येत असे. पण असे प्रसंग विरळाच.

गृहिणी......आदरांजली-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आदरांजली-२ इस्मत चुगताई : (१९११-१९९१) त्यांच्या काळातील बंडखोर व रुढींवर, ढोंगीपणावर विनोदाच्या अंगाने आसूड ओढणारे लेखन ही यांची खासियत. त्यासाठी त्यांनी बरीच किंमत मोजली पण चातुर्याने त्या त्यातून सहिसलामत पार झाल्या. त्या काळात असे लेखन करणे किती अवघड असेल याची आपण कल्पना करु शकतो.... का आजच्या काळात ते त्याहून कठीण आहे ......? या कथेत पुरुषी अहंकार, एका स्त्रीकडे माणूस म्हणून न बघता स्त्री म्हणूनच बघण्याचा समाजाचा हट्ट, चांगल्या घरची व वाईट घरची हा भेदभाव, नैसर्गिक भावना, बंधने, माणसाच्या मनात चाललेले खेळ..... इ.वर इस्मतआपाने चांगला प्रकाश टाकला आहे.

" The Original Love Story" ( Part 2)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . , " बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो .....

" The Original Love Story" (Part 1)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता.", " OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.", "असं .. का सर ?", "अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?", " नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता.

पत्र

लेखक आतिवास यांनी बुधवार, 11/03/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीटिंग संपली. बाया लगबगीने घराकडे परतल्या. “माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला. मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती. गेले . चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय.

घनचक्कर घोरींचे घनघोर-चक्र

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 11/03/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले ! इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली. ‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला..