Skip to main content

कथा

नशीब - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 28/04/2015 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे.

एका डेटींगची गोष्ट

लेखक अभिशेखि यांनी सोमवार, 27/04/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
समोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. अक्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्या सोबतचे अजून चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. कार्यक्रम शेवटाकडे यायला लागला. अक्ख्या वातावरणात संगीत पसरून गेलं होतं. शेवटचं गाणं सुरु होणार इतक्यात त्या ‘celebrity’ गायकाने त्याला बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चीत्कारणाऱ्या ‘crowd’ कडे बघत गायक म्हणाला ” Thanks Bro, This event was possible only because of you”. क्षणार्धात अक्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळ्या निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला.

तिची ओळख

लेखक अभिशेखि यांनी बुधवार, 22/04/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
“वैनी , नमस्कार.!!!” म्हणत ५-१० कार्यकर्त्यांचा घोळका दिवाणखान्यात येउन स्थिरावला. वहिनींनी सुद्धा हसून नमस्कार केला. “दादा येताहेत, चहा आणि नाश्ता केल्याशिवाय निघू नका” असं म्हणत त्यांची पावलं स्वैपाकघराकडे वळली. चहा आणि नाश्ता दिवाणखान्यात न्यायला सांगून त्या दादांच्या बेडरूमकडे निघाल्या. दादांची तयारी पूर्ण होत होती. नेहरू जाकीटाचं शेवटचं बटन लावून त्यांनी हात पुढे केला. वाहिनी लगबगीने पुढे सरसावल्या. खणातून काढलेल्या पांढऱ्याशुभ्र रुमालावर अत्तराचे दोन थेंब लावून त्यांनी तो दादांच्या हातात दिला. “बाहेर कार्यकर्ते…. ” वाहिनीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दादा बेडरूमबाहेर पडले होते.

गेम ड्रोम - २

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 21/04/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते .

मीटर डाऊन

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 17/04/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधून निघालो, बस स्टँड वर आलो तर हा धो धो पाऊस परत सुरु, चायला अख्खा दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, थांबायचे नाव नाही. मुंबईतला पाऊसच घाणेरडा चायला. मला २६ जुलै ची आठवण आली. FM वर सांगत होते, अर्धी मुंबई भरलीये पावसाने. बहुतेक ऑफिसेस दुपारीच सोडून दिली.आमचा बॉस हलकट पण एक नंबरचा, तो बाजूलाच राहतो. त्याला काय घेणंदेणं? अजिबात सोडले नाही आम्हाला. काम संपवून बाहेर पडेपर्यंत चांगलीच रात्र झालेली होती. गेला अर्धा तास बसची वाट बघतोय. ना बस ना टॅक्सी.हा रोड पण भरायला लागलाय पाण्याने. एरवी हे असले वातावरण मला जाम आवडले असते, एकदम थ्रील वाटते.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

राधा …....२

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राधा …....१ पहाटवाऱ्यानं सोबत आणलेल्या बासरीच्या सुरांनी राधेला उठवलं . राधेची लगबग चालू झाली . राधा जणू सोळा वर्षाची अल्लड युवती बनली. कितीप्रकारे नटली तरी तिचं समाधान होईना. शेवटी एकदाचा साजशृंगार आटपला आणि ती झपाझप शिवमंदिराच्या दिशेने चालू लागली . सूर्य नुकताच आकाशात डोकावत होता . मंदिरात पोचली तेव्हा तिथं कुणीच नव्हतं . कृष्णाची वाट पाहत ती आवारात बसून राहिली. हळूहळू लोक येऊ लागले. क्वचित कुणाच्या तोंडून त्यांच्या राजाची स्तुती ऐकू येई . आणि इकडे राधेचा उर अभिमानाने भरून जाई .

राधा …....१

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 13/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आता फक्त आजचीच रात्र. तिनं स्वत:लाच समजावलं. पण मन तर बाभरं झालेलं. ऐकतय थोडंच. ते द्वारकेत पोचलं सुद्धा. काय करत असेल तो या वेळी ? इतक्या वर्षांनी आपण भेटणार म्हणून डोळ्यातून आनंद उतू जात असेल का? त्याचे भावुक डोळे मनातलं सगळं बोलून जात. म्हणून गोकुळात असताना तिची कधी काही खोडी करायची असेल तर तो तिच्या मागे उभा राहत असे, डोळे लपवून. कारण त्याचे डोळे तिच्यापासून काही लपवू शकत नसत. याउलट अनयचे डोळे, तिला त्याआडचं मन कधी समजतंच नसे. अनयच्या आठवणीने तिच्या काळजात कळ आली. बिचारा! अनय म्हटलं की "बिचारा" हा शब्द तिच्या तोंडी आपसूक येत असे.

सुगंधा - भाग ३ (अंतिम)

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 09/04/2015 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या ..

सांगावा (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली. वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला. कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला . येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय. निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू. जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? '' नस्त्या चौकशा मुडद्याला ! *** जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत. पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार ! आपलीच झोळी फाटकी. नगु मनलं. पेन्शल मिळंल . पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ ! काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात. फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला. दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला. मंग आवाजच फुटंना !