Skip to main content

कथा

एक अविस्मरणीय क्षण

लेखक परी१२३४५ यांनी गुरुवार, 21/05/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत.

सुंदरीचे ओझे

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 20/05/2015 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

पुस्तकातील चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 17/05/2015 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बहुतेकांना बालपणी 'चांदोबा' तील चित्रांनी नक्कीच मोहवले असेल. खरोखर मासिके - पुस्तकातल्या कथांना अनुरूप अशी चित्रे बनवणे खूपच आव्हानात्मक काम असते, आणि अशी उत्तम चित्रे बनवण्यासाठी अत्युच्च दर्जाची प्रतिभा लागते. या लेखमालेद्वारे काही प्रतिभावान चित्रकारांनी पुस्तकांसाठी बनवलेली चित्रे इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हेन्री जस्टिस फोर्ड Henry Justice Ford (1860–1941) हे ब्रिटिश चित्रकार सुमारे 1880 आणि 1890 च्या दशकात खूपच प्रसिद्ध होते. यांची काही चित्र: १.

फ्रॅन्झ काफ्का....आदरांजली-१ : निवाडा....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/05/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फ्रॅन्झ काफ्का..... ३ जुन १९२४ रोजी फ्रॅन्झ काफ्काचा त्या काळातील असाध्य रोगाने म्हणजे टी.बीने मृत्यु झाला. अजून एका महिन्याने त्याचा ४१वा वाढदिवस साजरा झाला असता. त्याच्या मृत्युनंतर सापडलेल्या अनेक चिठ्याचपाट्यात त्याने त्याच्या जिवलग मित्राला, मॅक्स ब्रॉडला लिहिलेली पत्रे सापडली.

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/05/2015 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल. अर्थात थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे. मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते. मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता. म्हणून त्या मैदानाला लोक स्टीफन ग्राउंड म्हणून ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भाड मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पना करणे ही शक्य नव्हते.

अट्टाहास

लेखक रातराणी यांनी सोमवार, 11/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
आना वॉक करून परत आली आणि रोजच्या सवयीने तिने सगळ्या खिडक्यांचे पडदे बंद केले. म्हणजे ती अंधाराला घाबरत वगैरे नाही पण असा खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिसणारा काळोख तिच्या अंगावर येतो. मोठ्या हौसेन, एकांतात राहायचं म्हणून ती या घरी राहायला आली. दिवसा उजेडी छानच वाटत ते. छोट्याशा टेकडीवरच टुमदार घर, समोर पसरलेला विशाल समुद्र, त्याच्या काठावर डोलणारी नारळाची झाडं, अगदी चित्रात असतं तसच! पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती या घराच्या. तिच्या या विचाराच हल्ली तिला स्वतःलाच हसू येत. पहिल्याच भेटीत ती कुठल्या मुलाच्यादेखील प्रेमात पडली नाही. पण या घरी आली आणि तिला वाटल, आपलीच वाट पाहत थांबल होतं इतके दिवस.

जरुरत है, जरुरत है......

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 10/05/2015 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम?

डब्यातलं तत्त्वज्ञान भाग २

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/05/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
डब्यातलं तत्त्व्ज्ञान भाग १ आम्ही दोघंजण जिना उतरलो कमी, आणि उड्या मारत जास्त आलो. ट्रेन कधी निघेल काही सांगता येत नव्हतं. उशीर झाला होता तिला. मला उशीर झाला नव्हता, पण मी आपला उगाचच गंमत म्हणून तिच्याबरोबर धावत निघालो. लेडीज डबा बराच पुढे होता. त्यामुळे ती साहजिकच जास्त जोर लावून पळत होती. पण तिची मजल ट्रेन निघायच्या आत जास्त पुढे गेली नाही. मी तिच्या पुढून धावत होतो. ट्रेन निघाली तेव्हा मी जवळ जवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोचलोच होतो. पण ती चढल्याशिवाय मी चढणार नव्हतो. मला चढायचंच नव्हतं. तिच्याबरोबर थांबायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं.

रतीब

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 08/05/2015 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची. आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.

"नोकरी" - एक चित्रपट

लेखक वटवट यांनी गुरुवार, 07/05/2015 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रस्तुत प्रसंग आणि सर्व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो एकमात्र योगायोग समजावा)…. "नोकरी" रात्रीच्या चांदण्यांचा एक लूक घेतल्यानंतर, सगळ्यात सुरुवातीला कॅमेरा एका झोपडपट्टीवरून फिरतो… फिरत फिरत तो एका अरुंद अश्या बोळातून पुढच्या दिशेने जाऊ लागतो. जाताना आजूबाजूची दृश्ये खूप बोलकी असतात. एक गलितगात्र म्हातारा (वयोवृद्ध नाही…. म्हाताराच) खोकत असतो, दारात येउन. त्याच्या हातात एक तांब्या असतो, पण त्यात पाणी नसतं…( अरेरे….