Skip to main content

कथा

होयहोय- नाहीनाही

लेखक Sanjay Uwach यांनी बुधवार, 01/07/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचे चार वाजले होते. घरातील सर्वच माणसे गाढ झोपी गेली होती. आज कोर्टाच्या कांहीतरी कामासाठी, शामरावला लवकर शहरात पोहचायचे होते.एवढ्या सकाळी एसटी पण असणार नाही,बघू काय वाहन मिळते का! शामरावने आपले सर्व विधी, आधीच आटोपले होते. बरोबर चंची,आडकित्ता,सुपारी सर्व कांही त्यांने आपल्या बरोबर घेतले होते. कंबरेला नेसायचे धोतर त्याने उगीच उशीर नको ,म्हणून हातातच घेतले होते. मळकट पांढरा शर्ट,त्या खाली लंगोटी ,डोक्याला मुडांस असा एकदंरीत त्याचा पेहराव होता. सोप्यात येऊन त्यांने एक मिणमिणता दिवा लावला.

रामप्पा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 01/07/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नोकरीत सर्वात जास्त त्रास पगार वेळेवर न मिळण्याचा असतो असं म्हणतील काही लोक. मी म्हणेन एक वेळ ते चालेल , पण मालकाची बायको / मुलगा म्हणून ती/तो मालक बनून आपली नसलेली अक्कल पाजळून तुमच्या फील्ड मधल्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागले, आणि तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कंपनी ला त्यांच्यामुळे होत असलेलं नुकसान बघून हि काही करू शकत नाही हा असतो . माझं हि तेच होत होतं . एका नामांकित संस्थेत ट्रेनर आणि सेंटर मेनेजर म्हणून काम करत होतो, नशिबाने माझ्याबरोबरच तिथे लागलेला मार्केटिंग वाला हि प्रचंड उत्साही आणि डोकेबाज होता.

धुंदी कळ्यांना! भाग-२

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 30/06/2015 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ "सांग काय आहे तुझी अट?" अभि म्हणाला. "अभि, मला माझ्यावर झालेल्या रेपची केस पुन्हा ओपन करायची आहे. तू म्हणशील मागच सगळं विसरून नवी सुरुवात करू ,पण अभि मी नाही करू शकत आता अशी सुरुवात. मला आता हेही माहित नाही की मला जे साध्य करायचं आहे ते मिळणार आहे की नाही, पण एवढं नक्की माहितीये की एकदा ही केस पुन्हा सुरु झाली की मला मागे वळून नाही पाहता येणार. माझ्याशी निगडीत किती तरी गोष्टी बाहेर सगळ्या जगाला माहित होतील, तुला मान्य असेल अशा मुलीसोबत पुन्हा संबंध ठेवणे? मला तुझ्याकडून होकाराची अपेक्षा नाहीये अभि. तू नाही म्हणालास तरी काही हरकत नाही.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग २ कमांडर्स..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग ३ मागीलपानावरुन... ............त्या

वॉट्सअप आणि वॉट्सऍप

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/06/2015 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
"वॉट्सअप म्हणजे रे काय भाऊ?" "अरे,वॉट्सअप म्हणजे तो एक पश्चिमी देशात दोन व्यक्तीत संवाद साधण्य़ापूर्वी उच्चारलेला वाक-प्रचार आहे.हेलो आणि हाय ह्या ऐवजी हा वाक-प्रचारही वापरला जातो." "म्हणजे भारतात,दोन मराठी माणसं भेटल्यावर, "काय चालंय?" म्हणतात. किंवा दोन गुजराथी माणसं भेटल्यावर, सुं चाले छे?म्हणतात. किंवा दोन हिंदी भाषिक भेटल्यावर, "क्या चल रहा है?" म्हणतात असं म्हटल्यासारखं का रे भाऊ?" "अगदी बरोबर.वॉट्सअप हा वाक-प्रचार त्यांच्याकडे पूर्वापार आहे." "अरे,मग, वॉट्सऍप म्हणजे रे काय भाऊ?" "अरे,स्मार्ट फोनवर संवाद साधण्यासाठीची एक ऍप आहे ती." "ऍप म्हणजे रे,काय भाऊ?" "अरे,ऍप म्हणजे ऍप्लीकेशन.

रिटर्न गिफ्ट

लेखक रातराणी यांनी रविवार, 28/06/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज तोही आला होता त्याच्या आईबरोबर. ठिगळ लावलेला शर्ट आणि मळकी पँट.

द स्केअरक्रो - भाग ‍६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 28/06/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ द स्केअरक्रो भाग ६ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली ) सोनी लेस्टर आणि मी वँडा सीसम्सच्या घरातून जेव्हा निघालो तेव्हा सगळी वस्ती जागी झालेली होती आणि कामात होती.

"क्षणोक्षणी तापणारी समई….संजूमावशी"

लेखक वटवट यांनी शनिवार, 27/06/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
"चेतन…. ए चेतन…" आईनं हाक दिली. मी माझे जवळपास कपडे आवरले होते. एल.एल एम, ला पुण्यात अ‍ॅडमिशन घेतली होती. त्यासाठीच्या सामानाची आवराआवर चालू होती. तीन-चार हाका देऊनही मी अगदी अपेक्षितपणे उत्तर दिले नव्हते. आणि ह्याचीही सवय असल्याने अगदी शांतपणे तिनं पुन्हा हाक मारली. "आलो गं" मी. आमच्या घराच्या बाहेरच्या खोलीत आई माझं सगळं व्यवस्थित आवरून ठेवत होती. माझी बॅग भरत असताना ती म्हणाली. "हे बघ… हे आहेत भूकलाडू… नाश्त्याच्या वेळी खात जा. उजव्या कप्प्यात ठेवतीये. खव्याच्या पोळ्या पण देतीये, आठवडाभर चांगल्या राहतात. खूप भूक लागली असेल आणि जवळपास काही नसेल तेंव्हा खात जा…. चारीमुरीला तुला आवडतो तो …….

द स्केअरक्रो - भाग ‍५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 27/06/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ द स्केअरक्रो - भाग ‍५ ( मूळ लेखक मायकेल कॉनेली ) कार्व्हर त्याच्या आॅफिसमध्ये बसला होता. आॅफिसचा दरवाजा बंद होता. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता आणि अगदी एकटक समोरच्या कॅमे-यांच्या फीडकडे बघत होता. प्रत्येक कॅमेरा एका माॅनिटरला संलग्न होता आणि प्रत्येक माॅनिटर ३६ वेगवेगळ्या कोनांतून दृश्य दाखवू शकत होता.

धुंदी कळ्यांना! भाग-१

लेखक रातराणी यांनी शनिवार, 27/06/2015 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसभराच्या धावपळीनंतर आता रात्री जरा कुठे अपर्णा विसावली होती. बाहेर अगदी धो धो नाही आणि अगदी मुळूमुळू नाही असा पाउस पडत होता. छान गारवा पसरला होता. आता पांघरून घेऊन गुडूप व्हायचं असा विचार करून अपर्णा बेडवर गेली खरी पण बेडरूमच्या उघड्या राहिलेल्या खिडकीतून गार वार्याचा झोत अंगावर आला आणि ती शहारली. खिडकी बंद करायला म्हणून खिडकीत गेली आणि तिथेच उभी राहिली. सगळा थकवा, झोप कुठल्या कुठे पळून गेली. किती आवडतो असा पाउस आपल्याला ती मनाशीच म्हणाली. रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, अगदी एखाद दुसर वाहन जात होतं. अंगणातला प्राजक्त नखशिखांत ओलाचिंब झाला होता.