The Curse.......
इंडियन एज्युकेशन शाळेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये आज जल्लोषाला उधाण आल होत. निमित्त होत तब्बल सतरा वर्षानंतर होणारे दहावी 1998 बेचच्या रियुनियनचे. सगळीकडे उत्साह, आनंद नुसता ओसंडुन वहात होता. आजवर झालेल्या सगळ्या रियुनिअनपेक्षा ह्या रियुनिअनला फ़ार जास्त प्रतिसाद मिळाला होता. सहाजीक होत म्हणा. ह्या रियुनिअनच्या ऒर्गनाईजर्सनी फ़ार फ़ॊलोअप केला होता सगळ्यांचा. त्याचीच परिणीती म्हणुन ह्या रियुनिअनला परदेशी वास्त्यव्यास असलेले विद्यार्थीही उपस्थीत होते. पुन्हा नव्याने होणार्या भेटीगाठींसोबत जुन्या आठवणी मोकळ्या होत होत्या.
मिसळपाव
