द स्केअरक्रो - भाग १२
द स्केअरक्रो भाग ११
द स्केअरक्रो भाग १२ (मूळ लेखक मायकेल कॉनेली)
अँजेलाचं घर नक्की कुठे आहे याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती. मी रॅशेलला तिच्याबद्दल मला जे काही माहित होतं ते सगळं सांगितलं. अगदी तिला पोएट केसबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दलसुद्धा. तिचा ब्लॉग आहे हे मला माहित होतं पण मी तो कधीही वाचला नव्हता.
आम्ही हेलिकॉप्टरने नेल्लीसला जायला निघण्याआधी रॅशेलने ही सगळी माहिती एल.ए.मधल्या एका एफ.बी.आय.एजंटला सांगितली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे संभाषण शक्यच नव्हतं.
मिसळपाव