Skip to main content

कथा

शाप भाग - २

लेखक माझिया मना यांनी शुक्रवार, 07/08/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
"वहिनी सरकार" शारदेची हाक आली. चार पाच तरी हाका झाल्या असाव्यात. "काही होतंय का? दिवेलागणीला अशा का बसून राहिला आहात?" काय सांगणार तिला..काय होतंय माझे मलाच कळत नव्हते. मी जर मनातून हादरलेय हे उघड झाले तर वाड्यातले वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही. अजिंक्यराजे अन् राजश्री नव्या प्रोजेक्टचे काम पहायला गेले आहेत. परत येईपर्यंत जीवात जीव नाही. पोर्चमध्ये गाडीचा आवाज आला तशी धावत गेले. कधी एकदा अजिंक्यला सुखरुप पाहते असं झालेय. ते दोघे हसत येताना पाहून हायसे वाटत आहे. इतका वेळ उलटसुलट विचार करणारे मन थोडे शांत झाले.

सत्यकथा .. अध्याय - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/08/2015 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.

बिल्ला

लेखक बबन ताम्बे यांनी गुरुवार, 06/08/2015 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत सायंकाळी पाचचे टोल पडले आणि गण्या, किशा, दिल्या, दस-या, जया ही सगळी चौथीतली पोरे इतरांना ढकलत रस्त्याला लागली. आज गण्या खूप खूष होता. निबंध स्पर्धेत पहीला नंबर आल्यामुळे त्याला पन्नास रुपयांचे बक्षिस मिळाले होते. कधी एकदा आईला सांगतो असे त्याला झाले होते. "ए गण्या, सांग ना, पन्नास रुपयांचे काय करणारे.." - किशा. "लय मजा करणारे "- गण्या , " आपल्या सु-याकडं टॉय टॉय करणारी गाडी हाय ना, तशी आणनार हे. ती गाडी गर्कन वळती आन उल्टी उडी बी मारती. मला लय आवडती ती गाडी पण सु-याचा आजा मला हात लावून देत नाय.

अपेक्षाभंग . - (शशक स्पर्धेसाठी नाही )

लेखक तुडतुडी यांनी गुरुवार, 06/08/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर शतशब्द कथांची स्पर्धा चालू आहे . कथांचा पाऊस पडतोय नुसता .वाचकांचा आणि लेखकांचाही कल्लोळ चाललाय नुसता . आपणही घ्यावा का भाग ? आपल्याला बऱ्यापैकी जमतं कि कथा लिहायला . तो विचार करत होता . लिहूनच टाकू . अगदी पहिला नाही तर तिसरा तरी नंबर येईल अश्या दृष्टीने बराच वेळ विचार करून त्याने एक शशक कथा लिहिली आणि डकवली. १० मिनट दुसर्या कामात गुंतला . आत्तापर्यंत किती प्रतिसाद आले असतील ? किती जणानी +१ दिला असेल कितींनी -१ हे बघायला अधिरतेने त्याने मी .पा चं पान रिफ्रेश केलं अन ती महान अक्षरं झळकली 'The website encountered an unexpected error. Please try again later.'

सबकाँशस मधलं काही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 06/08/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!! ---------------------------------------------------------- कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स. धस्खड्ज्ज्सब शजसजशब्सज्जश् ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह... तो नुकताच वाचायला शिकला आहे. रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे. वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला. तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही. त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही. जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री.

बुधा!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 06/08/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात! तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली! पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित!

शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)

लेखक चिगो यांनी बुधवार, 05/08/2015 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन ************************************************************************************************* आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात.. तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो.. ..पण सगळं सेट होतं ! आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस ! ...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल. तर... वाचकांना ही विनंती आहे की... कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका. धन्यवाद.