Skip to main content

कथा

आशुची राउंड - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 23/08/2015 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
आशु आज भलताच खुशीत होता . नुकतीच त्याच्या बाबांनी एका प्रसिद्ध कंपनीची अलिकडेच लाँच झालेली फोर व्हीलर घेतली होती . आज रविवारचा सुट्टीचा दिवस . त्यामुळे आशुने हट्ट धरला होता 'आज मी नव्या गाडीवरुन एक राउंड मारुन येणार '. अखेर आई बाबांनी त्याला परवानगी दिली. तरीही निघताना आईने त्याला बजावले ' आशु , गाडी जपुन चालव . आणि फार लांब जाउ नकोस'. आशुनेही प्रॉमिस दिले 'हो आई .मी विजय चौकापर्यंत जाउन परत येईन.' आशुच्या कॉलेजमधले बरेच व काही खास क्लासमेटस विजय चौक परिसरात राहात होते. त्यामुळेच आशुने तिकडे जाउन यायचे ठरवले होते . विजय चौकापर्यंत येउन आशुने आता घरी परतण्यासाठी गाडी वळवली.

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन - उत्तरार्ध

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 22/08/2015 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध ती चमकून वळली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला खुदकन हसू आलं. तिनं खुलासा करताच तोही हसू लागला. त्यानंतरच्या तासाभरात ती दोघं नक्की काय बोलली कोण जाणे पण आयुष्यात प्रथमच ती इतकी मोकळी होत होती. स्टेशनवर उतरून थॅन्क्स म्हणून ती वळणार इतक्यात … " जस्ट इन केस " म्हणत कुठल्याशा कार्डवर त्यानं नंबर लिहून दिला आणि ट्रेन सुटलीच. झालं ते इतकंच. कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते.

[ शतशब्दकथा स्पर्धा ] - लोक्शाई (उत्तरार्ध) लोकमान्य (पुर्वार्ध)

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 22/08/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे.

द स्केअरक्रो - भाग ‍१९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 22/08/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग १८ द स्केअरक्रो भाग १९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) सोमवारी सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रॅशेलचा फोन कधीही येऊ शकला असता. मला त्याच्यासाठी तयार राहायचं होतं. त्यामुळे सकाळी सहा वाजताच मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मला फाईल्सवर काम करायचं होतं. आमची न्यूजरूम पूर्णपणे रिकामी होती. अगदी एखादं चिटपाखरूही नव्हतं. एकही रिपोर्टर किंवा एडिटर नव्हता. भविष्यकाळाच्या कल्पनेने माझ्या मनात चरकलं. एकेकाळी हीच न्यूजरूम म्हणजे जगातली सर्वोत्तम जागा होती काम करण्यासाठी.

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्धः 'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून?

आक्रोश! - (द्विशतशब्दकथा)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते.

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन.. ************************************************************************************** गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..." त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच ! अंगावर कोसळणार्‍या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली.

फस्ट बाइट लव्ह

लेखक कोमल यांनी बुधवार, 19/08/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले. बाकीच्या हाटेलान्प्रमने त्यालापण काचेचे दरवाजे लावले होते. त्याच्या आजूबाजूची गर्दी बर्यापेकी कमि होती. थोड्याच वेळात एक माणूस येउन ती काच पुसून गेला. अतिशय टणक आणि चकचकीत काच होती ती. मला त्या काचेमधुन आत एक सिम्बोल दिसला. का कोणास ठाऊक माज्या पोटात गुडुगुडू व्हायला लागलं. क्षणभरातच मला ते हॉटेल हवहव्स वाटू लागलं. मी काचेच्या दारातून आत गेले आणि वाशरूम चा बोर्ड असलेल्या दारातून आत घुसले. ५ मिनिटाने फ्लश करुन, बाहेर येउन मी ऑर्डर केलेल्या पिझ्याचा आनंदाने बाईट घेतला.

एक गोष्ट त्यांची पण !!!"

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 19/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक गोष्ट त्यांची पण !!!: रात्रीचे दहा तरी वाजले असतील . ती वाट बघत होती, म्हणजे तशी एकटीच आली होती ती विमानतळावर, कुणाला तरी जवळच्या माणसाला "रिसीव" करायला . गर्दीत असूनही आज ती जर हरवली होती . खर तर इराला वाट पाहण्याचा कधीच कंटाळा नाही यायचा. एखादे पुस्तक, मासिक किंवा आजू बाजूच्या माणसांचे निरीक्षण हा तिचा छंद होता , त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रशन तिला कधीच पडल नाही . पण आज मात्र वेळ पळत नव्हता अन विचार तर नाहीच नाही . आपण स्वतः का आलो आहे इथे ह्याचा विचार तिच्या मनातून जात न्हवता . खर तर , तिच्या मनात दुसरेच विचार हवे होते, थोडे हूर हूर लावणारे , लग्न अगदी काही दिवसांवर आले होते .

किडा वळवळला अन …

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 18/08/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
* सत्यघटनेवर आधारित, अत्यंत काल्पनिक कथा. हवेत सकाळच्यावेळीही उकाडा जाणवत होता, गुन्हा-अन्वेशनच्या कचेरीसमोर पोलिस व्हँन उभी होती, नुकतेच बाहेरून आत आलेला इंस्पेक्टर, कचेरीत जमलेल्या सर्वांवरून नजर फिरवत होता, सगळे आपापसात एकमेकांकडे पाहत होते, चालू फ्याशनप्रमाणे त्या पोरसवदा युवकांची, मानेवर रूळणारी व कान झाकणारी अशी, सिनेमातल्या अँन्ग्रीयंगमँन हिरोसारखी हिप्पी केशरचना होती, लांब कॉलर शर्ट अन बेलबॉटम पँट वेश. गावात अफवांचा पूर आला होता. भीतीचे सावट अधिक गडद झालेले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेले.