Skip to main content

कथा

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

दूध पोळलं

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 05/09/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
दूध पोळलं श्रीकृष्णाने फार पूर्वीच गोकुळ सोडले होते. तो आता द्वारकानाथ झाला होता. त्या अवधीत तो एकदाही गोकुळात फिरकला नव्हता. राधेला मात्र त्याचा विसर पडला नव्हता. बऱ्याच वर्षांनी ती मनाचा हिय्या करून कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेस निघाली. तिने एकटीने प्रवास केला. किती केला, कसा केला! तिचा तिलाच माहित...... केवळ कृष्णाला पाहण्यासाठी, त्याला एकवार भेटण्यासाठी! साधीभोळी राधा, कृष्णाच्या श्रीमंत महालात पोहचली. तिथले वैभव पाहून, बिचारी भांबावली. जराशी गोंधळली. तिने निरोप पाठवला, तशी कृष्णाच्या राणीवशात ‘हीच का ती !’ च्या अनेक भिवया वर झाल्या.

वाघ-या

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 05/09/2015 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती) "कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले. दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते.

वादळ (शतशब्दकथा)

लेखक रातराणी यांनी शनिवार, 05/09/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक काडी आणून चिमणा चिमणी घरटं बांधत होते. त्यांच्या लगबगीचं हिला फार अप्रूप. "अरे ही काडी इथे लावायची होती ना ?" "आधी नाही का सांगायच?" "आता सांगितल ना?" त्यांच्या चिवचिवाटाला तिचे शब्द. काल रात्री पावसानं धुमाकूळ घातला. तिनं खिडकीतून पाहिलं तर घरटं चिखलात पडलं होतं. एक एक काडी वेगळी झाली होती. सकाळी स्वच्छ ऊन पडलं होतं. झाडाखाली अस्ताव्यस्त घरट्याभोवती चिमणी चिवचिवाट करत होती. तो तिच्या मागे फिरत होता. काही दिवस सगळच विस्कळीत. एक दिवस अंगणात गजबज जाणवली. पुन्हा एकदा चिमणा चिमणीला काड्या आणून देत होता. कितीतरी वेळ तिनी दोघांची लगबग पाहिली.

परोपकारी गणू

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/09/2015 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज गावचा आठवडे बाजार. त्यामुळे सकाळची शाळा आणि दुपारी बारा वाजता सुट्टी. गणूला हा दिवस खूप आवडे. नेहमीप्रमाणे तो शाळेतून बारा वाजता घरी आला. घराला कुलुप होते.आई शेतावर मजूरीसाठी गेली होती आणि अजून तायडी पण शाळेतून आली नव्ह्ती. म्हणून तो घराच्या ओटयावर बसून राहीला. एव्हढयात त्याला शेजारच्या बिन्नूचा रडण्याचा आवाज आला. बिन्नू हा दुसरीत शिकत होता. त्याची आई सहसा कुठे बाहेर जात नव्हती पण आज ती घराला कुलुप लावून बाहेर गेली होती. घर बंद पाहून बिन्नू मोठमोठयाने रडत होता. गणूचा ह्या टिल्लूवर भारी जीव. त्याच्याशी खेळायला त्याला खूप आवडे. आज त्याला रडताना पाहून गणूची कालवाकालव झाली.

गंमत (भयगूढ कथा)

लेखक तुडतुडी यांनी शुक्रवार, 04/09/2015 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे उन्हाळ्याचा शेवट चालू होता .पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती . उन्हं कलू लागली होती . दिवसभर उन्हाच्या काहिलीनं वैताग आला होता .पण आता कसं गार वारं सुटल्या मुळं जीवाला बरं वाटत होतं .आभाळ जरा भरून आल्यासारखं वाटत होतं . दिवसभर फळं विकत बसलेली कमळी आता कंटाळली होती . तिच्या पाटीतला (टोपलीतला) शेवटचा द्राक्षाचा घड संपला .विक्री चांगली झाली होती . २-३ पेरू शिल्लक होते पण 'आता लई उशीर नगं करायला. न्हाईतर आई कावल' म्हणून तिनं ते जवळच्या कापडी पिशवीत घातले . जवळच्या बाटलीतलं पाणी बी दोन घोटंच उरलं होतं .ते संपवलं .लुगडं झटकून ती उठली . केस सोडून पुन्हा अंबाडा घातला .

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

वांझ

लेखक यमन यांनी बुधवार, 02/09/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती. पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय. वांझ सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ? स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं . पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं . गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या .

एक अनुभव - २

लेखक सुमित_सौन्देकर यांनी बुधवार, 02/09/2015 05:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक अनुभव अश्विता काय होतेय? बर वाटत नाही आहे का?...शेजारीच उभ्या असलेल्या काकांनी विचारल.. पण अश्विता काहीही न बोलता जोरजोरात हुंकार भरू लागली.. सुनील तुझ्या पोरीला धरलान र कुणीतरी.....गर्दीतून एक अनुभवी आवाज आला.. एव्हाना अश्विता सगळीकडे डोळे मोठे करून पाहू लागली होती, अस्पष्ट घोगर्या आवाजात ''मला सोडा, सोडा मला'' अस ओरडू लागली. .. बाळा जा जाऊन पटकन खालच्या अळीच्या शिर्या काकांना बोलाव...अस बोलून काकांनी एका लहानमुलाकरवी सांगावा धाडला. थोड्याच वेळात तो मुलगा शिर्या काकांना घेऊन आला..शिर्या काका भूत उतरवतो अस खुपदा ऐकल होत मी.