Skip to main content

कथा

अभोगी

लेखक यमन यांनी बुधवार, 09/09/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचा रंग कसा असतो माहितेय तुम्हाला ? काळा ,खोल खोल काळा . त्याच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला शोषून घेणारा . जिवंत प्राण्याला सहसा दिसणार नाही असा . काही लोक त्याच्या ओढिनेच मरण पत्करतात . मी नशीबवान . कितीही मोठा प्रतिभावान चित्रकार पकडू शकणार नाही असा हा रंग मी रोज अंगावर पांघरते . माझा आबा मरताना मला तीन लहान बहिणी आणि आमचं रक्त शोषणारी अपंग सावत्र आई देऊन गेला . आबा गेल्यावर पोटभर खायला मिळालंय असं फारसं झालंच नाही .लहान बहिणी भुकेपाई बाजारात बसायच्याच बाकी होत्या. पण देवाच्या दारात गर्दी खूप असावी . त्याला आम्हाला जगवत ठेवावं लागलं . देव निष्ठुर आहे त्याची सारखी प्रचीती देत.

वर्तुळ - शशक

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 08/09/2015 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.." पर्स मधील मोबाईल खणाणला. तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले. बंदुकीची नळी सरळ करत तिनं माझ्यावर रोखली. धडाम्... मी जागीच कोसळलो. थरथरत्या हातातली बंदुक गळून पडली. घाईघाईने ती निघाली. मोबाईलबरोबर बंदुकही पर्समध्ये टाकायला विसरली नाही. पिटुकल्या स्कुटीवर बसुन वाड्याकडे निघाली. वाड्याजवळ येताच धुंद हसली. करकरत दरवाजा उघडला. धावतच वरच्या मजल्यावर आली. एकटाच होतो. मी निलाजरेपणानं बेधुंद प्रणयाची मागणी केली. ती त्याच्यासाठीच आली होती. शृंगारल्या डोळ्यांनी ती लाजुन चुर झाली. तेवढ्यात, "पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला..

--------अन----लग्न----------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 08/09/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/09/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.” आज बर्‍याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्‍यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो.कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो.

कण्याचा धड़ा

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 07/09/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
-----------------कण्याचा धड़ा--------------- "26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा." सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा. पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे. 12वीत गॅप घेतलेला.

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

लेखक आदूबाळ यांनी रविवार, 06/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले.

द स्केअरक्रो - भाग ‍२४

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 06/09/2015 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २३ द स्केअरक्रो भाग २४ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) कार्व्हर त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता आणि त्याच्या समोर असलेल्या मोठ्या स्क्रीनकडे बघत होता. जवळजवळ शंभर वेगवेगळ्या प्रतिमा त्याला समोर दिसत होत्या. इतक्या ठिकाणी त्याने कॅमेरे बसवले होते की त्यामुळे वेस्टर्न डेटाच्या इमारतीच्या आजूबाजूचा भाग आणि तिथपर्यंत येणारा मॅककेलिप्स रोडचा भाग या सगळ्यावर त्याला नजर ठेवता येत होती. त्यांना शोधायला त्याला वेळ लागला नाही. ते परत येतील याची तर त्याला खात्री होतीच.

"येडाय का तु?"

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/09/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली. हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला. तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला. कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला. कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन. पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.