Skip to main content

कथा

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

गुड्बाय मिस्टर डॅनियल !!

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 14/09/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
गुड्बाय मिस्टर डॅनियल !! युरोपातील वंसत ऋतूच्या आगमनाची ती नुकतीच सुरवात होती. बर्फ़ाच्छादित पर्वत रांगामधून वेडीवाकडी वळणे घेत, एक टॅक्सी त्या भव्य प्रासादाच्या दरवाज्या समोर येउन थांबली.त्यातून काळसूट घातलेला एक उंचापूरा तरुण खाली उतरला.त्यांने टॅक्सीवाल्याचे पैसे दिले व तो त्या प्रासादाच्या दारासमोर जाउन थबकला.त्याला पाहून बाजूच्या छोट्या गेट मधून एक सुरक्षारक्षक बाहेर आला व त्यांने त्या तरुणाची विचारपूस केली, तसे तो तरुण बोलू लागला " मी डॅनियल ,मला ह्या पत्त्यावर मि.

चिमणी आणि कारटं (लघुत्तम कथा)

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 14/09/2015 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भुरभुर चिमणी बाळाच्या हातावर जाऊन बसली. बाळराजे खुश झाले. भुरभुर चिमणीला टकामका बघत राहीले.तान्हुला हात पुढे करून तिला पकडायला लागले. चिमणी भुर्रकन आकाशी ऊडाली. बाळराजे बघतच राहीले.बोबडया बोलांनी च्युव च्युव करत तिला परत बोलवु लागले. चिमणी झाडाच्या फांदीवर बसली. तिथुनच बाळराजेंना न्याहाळु लागली. मधुनच उडायची, वळचणीला फिरायची. बाळराजे दुडुदुडु धावले. चिमणीला पकडायचा पण करून राहिले. चविष्ट अमिषं दाखवुन तिला फशी पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण चिमणी बधली नाही. बाळराजेंच्या कचाट्यात सापडली नाही. बाळराजे उदास झाले. तोंड पाडून गपगार बसले. चविष्ट खाऊकडं बघेनासे झाले.

शिंदळ : आक्रमकांची नवी फळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 13/09/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार २. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 ) शिंदळ : आक्रमकांची नवी फळी यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं. देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता. देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते.

द स्केअरक्रो - भाग २६

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 13/09/2015 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केअरक्रो भाग २५ द स्केअरक्रो भाग २६ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) एफ.बी.आय.च्या इइआर टीममध्ये तिघांचा समावेश होता. त्यांनी वेस्टर्न डेटामध्ये आल्या आल्या तिथल्या कंट्रोल रूममध्ये जाऊन तीन मुख्य वर्कस्टेशन्सचा ताबा घेतला आणि कामाला सुरुवात केली. कार्व्हर त्यांच्या मागे येरझाऱ्या घालत होता आणि अधूनमधून त्यांच्या खांद्यांवरून पडद्यावर काय येतंय ते पाहात होता. त्यांना काय सापडेल याची त्याला काळजी वाटत नव्हती. त्याला जे त्यांना सापडायला हवं होतं, तेच त्यांना सापडणार होतं. त्याला खात्री होती तशी.

हाक! (शतशब्द्कथा)..भाग २

लेखक चिनार यांनी शनिवार, 12/09/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग शतशब्द्कथा स्पर्धेसाठी लिहिला होता. खालील दुवा बघावा.. http://www.misalpav.com/node/32313 "आई...........आई...बाळाला काय झालंय? तो का उठत नाहीये ? रागावलाय का तो ? मी तर भांडलो पण नाही त्याच्याशी आज..भांडणारही नाही कधी..त्याला उठायला सांग ना आई......सगळे खेळणे त्याचे.....त्याचीच पहिली बॅटिंग!...सांग ना त्याला.. बाबा..तुम्ही सांगा ना काय झालंय? आजी बघ ना आपल्या बाळाकडे...तुझा जास्त आवडता आहे ना तो..चालेल मला..मी नाही चिडणार बाळा..रोज किती वेळा हाका मारतो मला 'दादा दादा' म्हणून..आता मी हाका मारतोय तर का उठत नाहीये तू?

सिझोफ्रेनिया..... आजार की पेर्सेपशन?

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 12/09/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
अग, हसतेस काय? खरच सांगतो आहे मी. राजन म्हणाला मला की तू गिताशी बोलू नाकोस. ती काही ना काही कारणाने तुला आमच्यापासून तोडेल." विक्रांत गंभीरपणे गिताला सांगत होता आणि गिता हसत होती. " कमाल करतेस ह गिता. मी काहीतरी सिरीयसली सांगतो आहे. बर हे फक्त राजानच मत नाही; प्रकाश आणि हरीच सुद्धा हेच मत आहे." आता मात्र गिताला थोडा राग आला. "विकी मी का तोडेन तुला तुझ्या मित्रांपासून? आपण फक्त गेले काही दिवस झाले भेटायला लागलो आहोत. तेही कामाच्या संदर्भात. बर, आपली ओळख आत्ताची आहे आणि तुझे मित्र तर तुझ्याबरोबर लहानपणापासून आहेत ना? मग ते तुला ओळखत नाहीत का?

द स्केअरक्रो - भाग २५

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 12/09/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग २४ द स्केअरक्रो भाग २५ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) रॅशेलने फोन केल्यापासून अर्ध्या तासाच्या आत एफ.बी.आय.च्या एजंट्सनी फ्रेडी स्टोन जिथे राहात होता ती नुसती इमारत नाही, तर ती संपूर्ण गल्ली आपल्या ताब्यात घेतली. आम्हाला दोघांना अलग करून प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी बाहेरून मोठाल्या बसेससारख्या दिसणाऱ्या मोबाईल इंटरॉगेशन रूम्स आणल्या होत्या. अर्थात, एफ.बी.आय. त्यांच्याबाबतीत कधीच असा शब्दप्रयोग करत नसे.

शिंदळ

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 11/09/2015 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
यल्लमाच्या पायऱ्यावर सुनी संध्याकाळपर्यंत बसुन होती. दिवसभर देवळात भक्तांची रेलचेल होती. त्यांनी देवीपुढं ठेवलेले पुरणपोळी, शिकरण, नैवैद्य तिनं एका आडबाजुला साठवले होते. आज दिवसभरं ती तेच खात होती. अंधारायला आल्यावर सगळा प्रसाद फडक्यात बांधुन घराकडे चालु लागली. यलम्माच देऊळ अगदीच लहान, एकाच खोलीचं. पण इथे गुरव नव्हता म्हणुन सुनीनं बस्तानं बसवलेलं. गुरवं सगळी तिकडे मोठ्या देवळाकडं, तिकडं ती कधीच जायची नाही. नैवैद्य चोरणाऱ्या गावातल्या पोराठोरांना गुरवं हुसकावुन लावायची. पण या 'मोठया' देवळाकडं जाणारा प्रत्येक भक्त यल्लम्माकडं यायचाच, एखादातरी नैवैद्य आणि थोडीफार चिल्लर देवीला ओवाळायचा. देवीची ह

लाल खुरी( भय गुढकथा )

लेखक सत्य धर्म यांनी शुक्रवार, 11/09/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
बजाची पावल आज झपाझप चालली हुती , हातात कुर्हाड, खांद्यावर पोत आन दाव घेऊन त्यो सुसाट चालला हुत्ता.घरी आई आन बायकुची कटकट ऐकुन त्यो रागातच बहिर पडला आणि पांदी वलांडून कवा डोंगराच्या रस्त्याला लागला तेला बिगीर ते कळाल नव्हत. मनातंन त्यो म्हणत हुत , "भूत, खेत कूट असत्यात व्हय ?, च्या मारी या बायकांच्या घरी लाकूड तुकडा नाय आन सकाळ सकाळ लागले बोम्ब्लाया जाऊ नग रानात आज आवस हाय ".आज दावतोच ह्यांना म्हणत राग डोक्यात कालवून त्यो अजून जोरात त्या दगड धोंड्यातन वाट काढत चालू लागला.