Skip to main content

कथा

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या

झोपलेले नशिब

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 05/05/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची. अशीच काही वर्षे गेली. घरात अजुन एक बाळ आले. कोळ्याला वाटायला लागले, सभोवताल बदलतच नाहीये. तीच झोपडी, तेच जुने कपडे. रात्रीची झोप उडाली. एक दिवस स्वप्नात एक म्हतारा आला. स्वप्नात आला कि खरोखर आला हे काय कोळ्याला कळाले नाही. त्याने कोळ्याला सांगितले, की तुझे नशिब झोपलेले आहे. ते जोपर्यंत जागे होत नाही, काहीही बदलणार नाही.

मी नाही बोलणार जा.............

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 04/05/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अवनी आज प्रचंड घुश्श्यात होती. घरी आल्या आल्या तिने सोफ्यावर दफ्तर आपटलं आणि तडक वर आपल्या खोलीत निघून गेली. ज्योती किचनमधुन बाहेर पाणी घेउन येईपर्यंत वरुन धाडकन दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तिला आजच हे प्रकरण थोड विचित्रच वाटलं. सहसा अवनी अस कधी वागायची नाही. हा थोड़ी हट्टी होती, ती तर सगळीच मुलं ह्या वयात असतात पण इतरांप्रमाणे अवनी कधी आततायीपणा करायची नाही. आईविना पोर म्हणून ती तिच्या आजीची ज़रा जास्तच लाडकी होती एव्हढंच. पण बाक़ी अवनी होती अगदी गोड आणि लाघवी. पूर्वी दंगा करून घर डोक्यावर घेणारी अवनी मम्मा गेल्यापासून मात्र थोडी बदलली होती.

साधु हास्यानंद 2

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 03/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो.  भुतकाळातील आनंदी क्षण  विसरतो,  दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो.  आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो.  जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल,  आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, ' हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

साधु हास्यानंद 1

लेखक mohite jeevan यांनी शुक्रवार, 01/05/2015 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाव होते.नाव होते आनंदपुर.गाव लहान होते पण गावचे लोक खुप आनंदी आसे. त्याचे एकच कारण होते ते म्हणजे त्या गावात एक साधु बाबा राहत. त्याचे नाव त्याच्या स्वभावा नुसार पडले होते. त्याचे नाव होते साधु हास्यानंद . लोक त्याना हासरे बाबा नावाने ओळखत. गावातील जवळ जवळ सर्वच लोक त्याचा सल्ला घेत. त्यामुळे गावातील लोकांवर त्याचा प्रभाव पडलेला दिसत. एक दिवस गावातील लोकांनी त्याचा प्रवचनाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरविले.

सत्यकथा .. अध्याय १ आणि २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 30/04/2015 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
..................................................अध्याय पहिला...................................................................... नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.

जय मनु बाबा .....

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 30/04/2015 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी आतल्या खोलीतून बायकांमधे 'बाय अडली कि काय ओ' अशी दबक्या आवाजातील काळजीयुक्त गलका उमटला, दाराच्या आडोश्याला उभ्या असलेल्या, मनुने हे ऐकले मात्र, त्याची नजर समोरच्या गाभार्यावर खिळून राहिली, तिकडे पाहून नमस्कार केला, मनात 'माझ्या बहिणीला व तिच्या बाळाला, माझ्या भाच्याला जीवनदान दे देवा, याच भाच्याच्या हाताने दरवर्षीच्या यळ्ळूर गडाच्या जत्रेत, बिशीबेळेहुळी अन्न शिरापुरी अस ११ लोकांना जेवू घालीन' असा नवस घातला.…. थोड्यावेळाने गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बाळंतपणं सुखरूप झाल्याचं कळल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला.

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

जय गांधी बाबा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 29/04/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
तर नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता ऑफिस गाठण्यासाठी प्रचंड गडबडीत तयारी चालू होती. एक तर थंडीच्या दिवसात आरामात जाड ब्ल्यांकेट पांघरून मस्त झोपायचं असतं, आणि आम्ही ७ च्या ऑफिससाठी धडपडत असतो. कसं बसं ६:५५ ला सगळं आवरून निघणार तेवढ्यात बॉस चा मेसेज आला. "Lets take a day off today.. it seems we have a national holiday and a dry day too... so don't go off to find a bar now... have fun". "आयचा घो... आज कसली सुट्टी आता? किती मुश्किलीनं काल ल्याब सेट करत आणली होती. आता मधेच सुट्टी कसली? आणि सुट्टी तर सुट्टी हे काल नाही का सांगता येत? च्यामैला रविवारी सुट्टी नाही देत कधी.