Skip to main content

कथा

गजरा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 21/08/2014 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
माधव राव हृदय धक्क्याने गेले..अन सुमतीचे भाव विश्व बदलले. रिटायर्ड झाले अन ६ महिन्याच्या आतच माधव राव गेले.. सुमती एकटी पडली.. एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला होता.. मुलगा तिकडेच बोलावत होता पण सुमती बाई म्हणाल्या मला जरा वेळ दे विचार करायला... खरं तर त्यांना भारत व नातेवाईक सोडून जाववत नव्हते.. माधव व सुमतीचे एक मेकावर जिवापाड प्रेम होते..तस ठरवून च लग्न झाले होते पण मस्त जमले होते सुर दोघांचे. सुमतीला मोग~याचा गजरा खुपा आवडायचा व माधव तिला नेमाने आणून देत असे.. तसंच कधी छोटं मोठं भांडण झालं व सुमती नाराज झाली की गजरा हे एकमेव त्यावर औषध असे... दुपारचे जेवण झाले..खरं तर सुमतीला हल्ली फार

बेबी 2

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/08/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
बेबी लिफ्ट जवळ येऊन थांबली, वरुन कोणीतरी खाली येत आहे हे त्या लिफ्टच्या बाणावरुन समजले, ती वेंटीग आवस्थेत थांबली. तीच्या आजु बाजुला कोणी नव्हते, तरी ही ती कोणीतरी येतील का ते पाहत होती. पण कदापीही नाही,पण तीली भीती वाटत होती ती पाँवर आँफ होण्याची, बर्याच वेळा ती आपार्टमेटमध्ये आसताना लाईट गेली होती, ती कधी कधी प्रर्थना करीत की 'प्लिज पाँवर जाऊ नये,' आचानक लिफ्टचे दार उघडते, व त्या मधुन दोन जोडपी बाहेर येतात, ते दोघे पुरुष एकमेकाच्या कानात बेबी कडे पाहुन बोलतात, तर त्याच्याबरोबरीच्या मुली बेबीकडे पाहुन हासत ते लिफ्टच्या बाहेर येतात. बेबी त्याच्याकडे बघुन खाली मान घालते, व ती लिफ्टमध्ये जाते,त

सदू भारतीय क्रिकेट टीम मध्ये?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 20/08/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीयुत सदानंद सुखात्मे उर्फ सदू, खरा मुंबईकर. सचिवालयात कार्यरत. मुंबईत सध्या अच्छे दिन आल्या नसल्याने, सदूची सुखाची नौकरी सुरु आहे. सकाळी ९ वाजता सदू घर सोडतो आणि सांयकाळी ५.३० वाजता पुन्हा घरात. अशी ८ तासाची सुख-चैनीची सरकारी नौकरी. खरोखरंच सदू नावाप्रमाणे सुखात्मे अर्थात सुखी आहे. सचिवालयातल्या इतर बाबूंप्रमाणे सदूला ही क्रिकेटचा भयंकर शौक. क्रिकेट वर ‘एक्स्पर्ट कॉमेन्ट’ देण्यात सदू स्वत:ला पटाईत समजत होता. कुठल्या खेडाळूने कसे खेळले पाहिजे त्याचे विशद वर्णन तो करत असे. इंग्लंड सिरीजमध्ये भारतीय टीमची दुर्दशा पाहून इतरांप्रमाणे तो ही दुखी होता.

एक लघुकथा.....अमान

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 20/08/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या बापाचे नाव ‘नासिर’ माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. 

खरे नाव माझे मलाच माहीत नाही. 

आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर ! आब्बाचा मी खूप लाडका होतो. माझा भाऊ ‘अमान’ हा माझा लाडका होता. शेतात दिवसभर उंडारायचे आणि गिळायला घरी अम्माच्या मागे भुणभुण लावायची एवढेच काम आम्ही करीत असू. एकदा एका घोड्याला आम्ही विहीरीत पाडले पण कोणी आम्हाला रागावले नाही. आब्बाने तर माझ्या पाठीत लाडाने गुद्दा घातला.