कथा
शकू
शकू पिंपळाच्या पारावर शांतपणे बसली होती..हळुवार वा~याने पिंपळपान सळसळत होती...गर्द काळसर हिरवी सावली पिंपळाने तिच्या मस्तकार धरली होती..उन्हे कलायला आली होती..सोकावलेला अंधार वाड्यावर पडणार होता...स्त्रीत्वाच्या अपूर्णतेची लक्तरे तिच्या तनूवर लोंबत होती..
लग्न होऊन ७ वर्षे झाली होती..पण कूस उजवली नव्हती..प्रथम प्रथम पाळी येण्याच्या वेळी ति उत्सुकतेने पाळी चुकेल अश्या आशेवर असायची...पण दिवसा मागून दिवस जात होते..पाळी चुकत नव्हती..
तिने पाहिले ...मांडीवर कोवळ पिंपळपान पडले होते..हळुवार पणे तिने ते उचलले..नवजात अर्भकाच्या कोवळ्या तनु सारख ते कोवळ पान होते..पानाच्या शिरा तिला दिसत होत्या..
गोदाक्क
बेबी
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?',
कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती.
जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली,
'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,'
डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला,
'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,'
हे एकताच तीने आपले जो
भुताळी जहाज - ३ - वॉटरटाऊन
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींबद्दल जगभरात सर्वत्रं दोन मतप्रवाह आढळतात. एक मतप्रवाह म्हणजे हे सर्व खरे आहे अशी खात्री असणारा आणि दुसरा म्हणजे हे सर्व धुडकावून लावणारा!
खात्री असणार्यांचा कोणत्याही अनुभवावर चटकन विश्वास बसतो. अनेकदा असे अनुभव हे आपल्याला अतिंद्रीय अनुभव येत आहेत या गृहीतकावर आधारीत भासमान विश्वं असण्याची शक्यता असते. याऊलट अतिंद्रीय शक्तींवर अजिबात विश्वास नसलेल्यांची हे सर्व थोतांडं आहे अशी पक्की खात्री असते.
भुताळी जहाज - २ - यूबी - ६५
अतिंद्रीय आणि अमानवीय शक्तींचे अनुभव अनेकदा जहाजांच्याच वाट्याला येत असले तरी यात एका पाणबुडीचाही समावेश आहे - यूबी-६५ !!
पहिल्या महायुध्दाला तोंड फुटल्यावर जर्मनीने ज्या अनेक पाणबुड्या बांधण्यास सुरवात केली त्यापैकी एक म्हणजे यूबी-६५. १९१६ मध्ये या हॅम्बुर्ग इथे या पाणबुडीचं बांधकाम सुरु झालं. बांधकाम सुरु असतानाच या पाणबुडीवर ती शापित असल्याचा शिक्का बसण्यास सुरवात झाली.
पाणबुडीचा मुख्य सांगाडा बांधण्याचंं काम सुरु झाल्यावर आठवड्याभरातच सांगाड्याला आधार देणारे दोरखंड तुटून वर असलेला भाग दोन कामगारांवर कोसळला!
भुताळी जहाज - १ - इव्हान व्हॅसिली
अमानवीय आणि अतिंद्रीय शक्तींबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. आपल्याला आलेल्या अनुभवांचं शास्त्रीय स्पष्टीकरण करणं हे कधीकधी अशक्यं होतं आणि रुढार्थाने त्याचं भूतं-खेतं किंवा 'बाहेरचं' असं वर्गीकरण केलं जातं. अर्थात अमानवीय अनुभवांच्या ज्या कहाण्या सांगितल्या जातात त्या प्रत्यक्षात कितपत खर्या असतात आणि कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडलेल्या असतात हा भाग अलाहिदा.
गेल्या कित्येक शतकांपासून मानवाने सप्तसागरांत संचार केला आहे. या संचारासाठी वापरण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांनी सागराचा तळही गाठलेला आहे.
एका संध्याकाळेचा निरोप….!
वेळ: एक संध्याकाळ
.... तसं पहायला गेलं तर त्याच्या तिच्या आयुष्यात संध्याकाळचं महत्व अनन्यसाधारण… त्याच्या तिच्या असंख्य क्षणाची मूक साक्षीदारंच ती… त्यांच्या "क्षणांना" झालेली सुरुवात… त्यांनी गाठलेली सर्वोच्च पातळी… त्यांचे रुसवे-फुगवे….
पाउस
संध्याकाळ झाली आणि काळोखाबरोबर पावसाची रिपरिप वाढली. समोरच्या समुद्र किना-यावर तरुणाईच्या हुल्लडबाजीने जोर पकडला होता. नाना हळु उठले आणि त्यांनी खिडकी लावुन घेतली. जपाची माळ घेवुन बसलेल्या माईंकडे त्यांचे लक्ष गेले. काठी च्या मदतीने ते उठले आणि थरथरत्या हातांनी त्यांनी औषधाचा बॉक्स उघडला. बारीक पांढ-या गोळ्या त्यांनी माईंच्या हातात ठेवल्या. काही न बोलता माईंनी त्या गिळल्या. घडाळ्याचा काटा जस जसा ७ च्या दिशेने सरकु लागला तसे नाना बेचैन झाले. एवढ्यात शेजारच्या काकु उगीचच वर्तमानपत्र घेण्याच्या निमित्ताने डोकावुन गेल्या. काळ इथेच थांबला तर बरे असे वाटुन नानांच्या छातीतील धडधड वाढली.
एक सुगंधीत जखम…. ती…!
विधात्यानं दिलेलं हे जगणं जगताना प्राक्तनाशी भातुकलीचा खेळ खेळण्याचा खूपदा प्रसंग येतो. प्राक्तनाशी खेळला जाणारा हा खेळ भातुकलीचा म्हणायचा तो एव्हढ्यासाठीच कि तो कधी न कधी संपणारा असतो म्हणून आणि भातुकलीचा खेळ जरी संपला तरी तो तात्पुरताच संपतो... तो कधीच कायमचा संपत नाही. दिवस बदलत जातात. आपण बदलत जातो. ह्या भातुकलीच्या खेळाचं स्वरूपसुद्धा बदलत जातं. पण हा खेळ खेळण्याचं आपण टाळू कधीच शकत नाही. मग हा खेळ खेळताना आपण ठेचकाळतो, पडतो. जखम होते…. जखमाही होतात. काही बर्या होतात. काही बर्या होतायेत असं वाटतं पण नंतर डोकं वर काढतात.
मिसळपाव