कथा
माळरानी खडकात जेव्हा रुजते बियाणे...
यंदा पावसाने ताण दिला नि आख्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कुठून कुठून पैदा केलेले बियाणे ज्याने त्याने घाई करून पेरले होते. पालख्या पंढरपुरात पोहचल्या कि हमखास पाऊस लागतो असा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु यंदा पालख्या परत फिरल्या तरी पाऊस जोर धरत नव्हता. दिवसातून एखादी सर यायची पण अंगावरील कपडे देखील भिजायची नाहीत. कमी ओलीमुळे दाणा पीठाळला नि उगवण चांगली झालीच नाही. उगाच कुठतरी फुटा दोन फुटावर मोड दिसत होता.
अर्ध्या एकर शेतात पेरलेल्या भुईमुगाच्या विरळ मोडांकडे हताशपणे पाहत रायाजी बसला होता. वीस किलो बी त्याने बाराशे रुपयांचे घेतले होते.अजून जगुनानाचे पैसे दिले नव्हते.
वालक्या
बालपणी माझ्या बऱ्याच आठवणीत असणारा आमचा वालक्या... माझ्यापेक्षा साधारण 10-15 वर्षे मोठा असेल. नक्की सांगता येणार नाही. सर्वांसाठी फक्त वालक्याच. त्याच्याही नजरेत कधीही कुणासाठीही दुजाभाव दिसला नाही. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे एक अजब रसायन. बहुधा देवाला दुर्लक्षून जन्मला असावा. त्यामुळेच ईतर कुणीही त्याच्याकडे फारसे लक्ष देतांना पहाण्यात आले नसावे.
सकाळी सकाळी शाळेच्या समोर, रस्त्याकडेला हा उभा. अंगात काळसर, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि खाकी विजार. ती हि अर्धी. पायात चप्पल असल्याची कधी पहिलीच नाही. पाय सतत चालते, पण जागीच.
गाल चोळ फक्त
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही
पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग
ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही
नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग
तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग
पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई,
चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही
कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग
पैजारबुवा,
प्रारब्ध
सकाळच्या वेळी चहा पिता पिता दिवसभरचे प्लान्स करत होतो. तेव्हढ्यात बेल वाजली. शेजारच्या नवलेकाकु आत आल्या...
"बातमी कळली का?"
"कसली बातमी"
"अरे ते चौथ्या मजल्यावरचे जोशीकाका वारलेत ना सकाळी सात वाजता"
"अच्छा" अच्छा हा उद्गगारवाचक शब्द कुठेही मुर्खासारखा वापरतो आणि मग ओशाळल्यासारखे होते.
तशी आमची बिल्डिंग नवीनच होती आणि सगळी नवीन कुटुंबच होती त्यामुळे एकमेकांशी फ़ारशी ओळख नव्हतीच. आम्ही तर दिवसभर ऑफ़िसमधे चकाट्या पिटणारी लोकं आम्हाला तर नावावरुन चेहरा लक्षात येण्याची शक्यताच नव्हती. जोशीकाकांना कधी पाहिले असावे का असा विचार मी करुन लागलो. पण काही चेहरा लक्षात येत नव्हताच.
हझारो ख्वाहिशे ऐसी...समाप्त
भाग एक : http://www.misalpav.com/node/23033
भाग दोन : http://www.misalpav.com/node/23154
भाग तीन : http://www.misalpav.com/node/23248
....आम्ही तळजाईची वाट चढत होतो आणि मी मनात खूप वर्षांपूर्वी उतरलेली सिंहगडाची वाट पुन्हा उतरत होतो...सोसायटी मधली आम्ही सगळी पोरंसोरं मिळून सकाळी सहाची पीएमटी विश्व हॉटेलपासून पकडून गडावर गेलो होतो. सिंहगड वॉज माय टर्फ. अख्खी कल्याण, अवसरवाडी तरफ आमच्या घरातल्या सगळ्यांना नावानिशी ओळखत असे.
२१ डिसेंबर
फोटोकॉपी मशीन समोर उभ्या राहिलेल्या प्रोफेसर देवधरांनी विचारांच्या भरात आकडा पंच केला 'एकवीस'. मशीनचा झूSS असा आवाज सुरू होताच ते भानावर आले, आणि त्यांना आपली चूक उमगली. हल्ली बरेचदा त्यांचं असंच व्हायचं, ते एकवीस डिसेंबरचं मनावर घेतल्यापासून.
देवधरांना बहुतांशी शास्त्रज्ञ मॅड सायंटिस्ट म्हणायचे, म्हणजे देवधर खरंच वेडे वगैरे नव्हते पण पराकोटीचा आनंद आणि पराकोटीची निराशा यांच्यामधली भावना त्यांना कधी माहीतच नव्हती.
मिसळपाव