वेंकट
नमस्कार
मी वेंकटेशन अय्यर .
हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो...
लंचब्रेक मध्ये सगळेजण हास्यविनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता ...
मिसळपाव